तरुण भारत

अन्…अधिकाऱयांच्या पायाखालची वाळू घसरली

प्रतिनिधी/ बेळगाव

श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती देऊन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यास गेलेल्या व्यक्तीला कुमार गंधर्व सभागृहाकडे पाठविण्यात आले. त्यामुळे त्या ठिकाणी दाखल होऊन त्रास होत असल्याची माहिती दिली. यावेळी वैद्यकीय चाचणी केली असता सदर व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली. त्यामुळे  अधिकाऱयांसह कर्मचाऱयांच्या पायाखालची वाळू घसरली. अखेर सिव्हिल हॉस्पिटलला त्या क्यक्तीला पाठविण्यात आले.

Advertisements

अथणी येथील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र, प्राथमिक संपर्कात आलेल्या कुटुंबातील सदस्यांची आणि नागरिकांची तपासणी करून क्वॉरंटाईन करण्यात आले नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीच्या मुलाला श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने सदर मुलगा बुधवारी सकाळी स्वतःच्या वाहनाने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. पण त्याला कुमार गंधर्व सभागृहाकडे पाठविण्यात आले. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याने स्वत:चे वाहन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पार्क करून रिक्षाने कुमार गंधर्व सभागृह गाठले. त्या ठिकाणी गेल्यानंतर व्यक्तीची माहिती घेऊन वैद्यकीय तपासणी केली असता ताप आणि सर्दी असल्याचे आढळून आले. आपल्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती त्याने वैद्यकीय अधिकाऱयांना दिली. त्यामुळे कुमार गंधर्व सभागृहात सेवा बजावणाऱया कर्मचाऱयांची भंबेरी उडाली. आलेल्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्याने अधिकाऱयांची धावपळ सुरू झाली. तातडीने खबरदारी घेऊन त्या व्यक्तीला सुरक्षित ठिकाणी बसविण्यात आले. सिव्हिल हॉस्पिटलला ही माहिती देऊन त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुलाच्या वडिलांना कोरोनाची लागण झाल्याचे चाचणी अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांची माहिती घेऊन क्वॉरंटाईन करण्याची गरज होती. पण याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्याच्या मुलाला श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी आल्यानंतर दाखल करून घेण्याऐवजी कुमार गंधर्व सभागृहात पाठविण्यात आले.

रिक्षाचालकासह संपर्कात आलेल्या

व्यक्तींचा शोध घेण्यासाठी धावपळ

श्वसनाचा त्रास वाढू लागल्याने स्वतःच्या कारने जाण्याऐवजी रिक्षाने कुमार गंधर्व सभागृहाकडे आला. पण चाचणी केली असता ताप असल्याचे आढळून आल्याने रिक्षाचालकासह संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. अखेर राणी चन्नम्मा चौकातील रिक्षा स्थानकावर संपर्क साधून रिक्षाचालकाला शोधण्यात पोलिसांना यश आले. पण सिव्हिल हॉस्पिटलच्या बेजबाबदारपणामुळे सर्वच गोत्यात आले आहेत. 

Related Stories

बाजारातील कचरा उचलण्यासाठी पालिकेचे नियोजन

Patil_p

विनापरवाना व्यावसायिकांकडून 18 हजार रुपये दंड वसूल

Omkar B

भारतीय टपाल सेवेला आधुनिकतेची कास

Amit Kulkarni

नुकसानामुळे मिरची व्यापाऱयाची आत्महत्या

Rohan_P

गांधीनगर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी नेमावा

Abhijeet Shinde

नो पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकींवर कारवाई

Amit Kulkarni
error: Content is protected !!