तरुण भारत

बुधवारी 136 कोरोनाबधित

प्रतिनिधी/ पणजी

आतापर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत काढून कोरोनाने काल बुधवारी नवा उच्चांक स्थापन केला. काल एकाच दिवशी तब्बल 136 बाधित सापडले. राज्यात कोरोनाची स्थिती विस्फोटक बनत चालली असून जनतेमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याद्वारे बाधितांची एकूण संख्या 824 वर पोहोचली आहे. चाचणी केलेल्यांपैकी अद्याप 1441 अहवाल प्रतीक्षेत आहेत. बुधवारी 51 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Advertisements

मांगोरहिलमधील रुग्णांची संख्या काल पुन्हा वाढली. आता मांगोरहिलची संख्या 62 वर पोहोचली आहे. मांगोरहिलशी संबंधित रुग्णांचा आकडा 286 वर पोहोचला आहे. सडा-वास्को येथील रुग्णसंख्या 78 वर पोहोचली आहे, तर बायणा येथील रुग्णसंख्या 85 वर पोहोचली आहे. न्यूवाडा 68 तर जुवारीनगरचा आकडा 106 वर पोहोचला आहे. खारीवाडा येथे एकूण 42 रुग्ण झाले आहेत.

कुडतरीत 32, मोर्ले 22, बाळ्ळी येथील कोरोनाबाधितांचा आकडा 27 वर पोहोचला आहे.

सांखळीची संख्या वाढतीच

सांखळी येथील बाधितांची संख्या वाढत चालली असून कालच्या अहवालानुसार आतापर्यंतची संख्या 50 वर पोहोचली आहे. चिंबल येथील आतापर्यंतची रुग्णसंख्या 54 वर पोहोचली आहे. आंबेलीशी संबंधित रुग्णसंख्या 11, केपे 16, लोटली 5, म्हापसा 7, कामराभाट 7, काणकोण 8, शंकरवाडी 4, वेर्णा 8, मोतीडोंगर 14, फोंडा 32, वाळपई 12, माशेल 5, उसगाव 6, डिचोली 10, शिरोडा 7, पेडणे 9, पिलार 3, गोवा वेल्हा 9, बेतकी 10, सांगे 4, मंडूर 13, धारबांदोडा 16, कुंकळळी 14, पर्वरी 4 अशापद्धतीने रुग्णांची नोंद झाली आहे.

अनेक भागात नव्याने रुग्ण सापडणे सुरू आहेत. कोरोनासोबतच जगायचे आहे, असा दावा सरकारने या अगोदर केला होता आता त्याबाबतची सत्यता लोकांना पटू लागली आहे. कोरोनाचे लोण शहरीभागापासून ग्रामीण भागापर्यंत सर्वत्र पसरले आहे. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड मोठी धास्ती निर्माण झाली आहे.

Related Stories

भरमसाठ येणाऱया बिलामुळे काँग्रेसवासीयांचा वीज खात्यावर मोर्चा

Amit Kulkarni

”तृणमूल काँग्रेससोबत महाराष्ट्रवादी गोमंतकची युती कायम”

Sumit Tambekar

गोवा भाजप माजी सैनिक विभाग संयोजकपदी अनंत जोशी

Amit Kulkarni

राजकारण हे सत्ता, पद, पैसा मिळवण्याचे साधन नाही

Omkar B

नवीन पहाट उजाडण्यासाठी गोव्यातील युवावर्ग सक्षम

Patil_p

चोपडे येथील नागरिकांचा तरंगत्या जेटीस विरोध

Patil_p
error: Content is protected !!