तरुण भारत

वेगन सौंदर्यप्रसाधनं… ऑन डिमांड!

कोरोनामुळे जगभरातले लोक जागरूक होऊ लागले आहेत. घातक रसायनं, प्राणीजन्य घटकांच्या वापरामुळे होणार्या 
दुष्परिणामांची जाणीव होऊ लागल्यामुळे रसायनयुक्त सौंदर्यप्रसाधनांऐवजी वेगन तसंच ऑरगॅनिक म्हणजेच पूर्णपणे नैसर्गिक घटकांचा वापर करून तयार करण्यात आलेली उत्पादनं वापरण्यावर भर दिला जात आहे. सौंदर्यप्रसाधनांच्या जगात हा नवा बदल अनुभवायला मिळत आहे. वेगन तसंच सात्विक आहाराला महत्त्व देणार्यांना आता वेगन सौंदर्यप्रसाधनं हवी आहेत. आपल्या मेक अप किटमध्ये नैसर्गिक घटकांनी युक्त सौंदर्यप्रसाधनं असावीत, असं अनेकींना वाटू लागलं आहे. महिलांच्या या बदलत्या अपेक्षा लक्षात घेऊन बहुराष्ट्रिय कंपन्यांनीही अशी उत्पादनं बाजारात उतरवायला सुरूवात केली आहे. 

मान्सून काळात त्वचेची जास्तच काळजी घ्यावी लागते. वेगन तसंच ऑरगॅनिक सौंदर्यप्रसाधनांमधली जीवनसत्त्वं तसंच खनिजं त्वचेमध्ये अगदी सहज शोषली जातात आणि त्वचेला आवश्यक पोषण मिळतं. बॅक्टेरियाविरोधी तसंच अँटी एजिंग गुणधर्मांमुळे ही उत्पादनं महिलावर्गाच्या विशेष पसंतीस उतरत आहेत. 

Advertisements

Related Stories

सरिताच प्रेरणादायी कार्य

Amit Kulkarni

उपयुक्त इसेन्शियल ऑइल

Amit Kulkarni

गणित पैशांचं

Omkar B

बजेटमधलं शॉपिंग

Omkar B

आहारतज्ञांकडे जाताय?

Omkar B

ब्रोकेडची शान

Amit Kulkarni
error: Content is protected !!