तरुण भारत

कोणासही जीवे मारण्याची धमकी दिली नाही- सरपंच संजय घोरपडे

चंदुर/प्रतिनिधी

चंदुर गावात काल झालेला प्रकार हा वैयक्तिक वादाचा भाग असून त्यात सरपंच व इतर ग्रामपंचायत सदस्यांनी कोणत्याही नागरिकास जीवे मारण्याची धमकी दिली नसल्याची माहिती सरपंच संजय घोरपडे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.त्यांनी कालच्या घटनेबद्दल माहिती सांगताना शाहू नगर गल्ली नंबर 6 मध्ये दोन्ही बाजूला गटारीचे काम चालू असताना एका व्यक्तीचे गटारीच्या बांधकामासाठी कट्टा फोडल्यामुळे त्याने समोरील शेजाऱ्याच्या दारातीलही कट्टा फोडूनच गटार करावी अशी बेकायदेशीर मागणी करत गोंधळ निर्माण केला व शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.अशा घटनेला सरपंच,ग्रामविकास अधिकारी व सद्यस्यांनी विरोध केल्यामुळे समोरील व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिल्याची खोटी माहिती पसरवली व व्हिडिओ प्रसारित केला.

याउलट सरपंचवरच हल्ला करण्याचा प्रयत्न तक्रारदार व्यक्तीने केला त्याचबरोबर प्रसारित व्हिडिओत कोठेही जीवे मारण्याचा उल्लेख नाही असेही स्पष्टीकरण सरपंच संजय घोरपडे यांनी पत्रकार परिषदेत दिले. त्याचबरोबर शासकीय कामात अडथळा आणणे व संचारबंदी च्या काळात गर्दी करून कायद्याचा भंग करणे या बाबींसाठी वेळ आली तर आम्ही सदर व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करू अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपसरपंच रामा सावंत, माजी सरपंच पिंटू जाधव, सुधीर पुजारी, रवी गोंदकर आदीसह सदस्य उपस्थित होते.

Advertisements

Related Stories

विद्यापीठ परीक्षा ऑनलाईन

Abhijeet Shinde

यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ

Abhijeet Shinde

वीजदर कपातीची घोषणा फसवी : ६.७ टक्के दरवाढ होणार

Abhijeet Shinde

18 ते 44 वयोगटातील लसीकरणाचा वेग मंदावणार, वृद्धांना पहिले प्राधान्य ; राजेश टोपेंनी दिली माहिती

Abhijeet Shinde

माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांना कोरोनाची लागण

Abhijeet Shinde

‘महाविद्यालयीन जीवनात कला, क्रीडा क्षेत्रालाही महत्त्वाचे स्थान’

Abhijeet Shinde
error: Content is protected !!