तरुण भारत

पंजाबमध्ये कोरोना बाधितांची संख्या 6907 वर

ऑनलाईन टीम / चंदीगड : 

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यातच बुधवारी कोरोनामुळे गुरुदासपुर 1, लुधियाना 1 आणि जालंधरमधील एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे पंजाबमध्ये आतापर्यंत कोरोनामूळे 178 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कालच्या दिवसात 158 नवीन रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. 

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, काल सापडलेल्या 158 नव्या रुग्णांमूळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकुण संख्या 6907 झाली आहे. तर कालच्या एका दिवसात 274 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर आत्तापर्यंत एकूण 4828 रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

 
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत 3 लाख 60 हजार 189 रुग्णांचे नमुने घेण्यात आले आहेत.  तर राज्यातील विविध आयसोलेशन वॉर्डमध्ये 1901 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 57 रुग्ण ऑक्सिजन सपोर्ट वर  आणि 6 जण व्हेंटिलेटरवर आहे. 


बुधवारी कोरोनामुक्त झालेल्या 274 रुग्णांमध्ये जालंधरमधील 111, लुधियाना 41, संगरुर 20, पटियाला 18, मोहाली 12, गुरदासपुर 8, तरनतारन, फरीदकोट, कपूरथला आणि मानसमधील 1-1,  फिरोजपुर 22, फतेहगड साहिब 10, फाजिल्का 14, बठिंडा 6, नवांशहर व रोपड मधील प्रत्येकी 3 आणि होशियारपुरमधील दोन रुग्णांचासमावेश आहे. 

Related Stories

शाहीस्नानासाठी रेल्वेही सज्ज

Patil_p

पंतप्रधान मोदींशी पंजाब मुख्यमंत्र्यांची चर्चा

Patil_p

कुतुबमिनारपेक्षाही दीडपट उंच रेल्वेब्रिज

Patil_p

इंधन दरवाढीमुळे विमान प्रवास महागणार

Patil_p

रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी हवा पाकिस्तानी व्हिसा

Patil_p

काश्मीरमधून 10,000 सुरक्षा रक्षक मागे

Patil_p
error: Content is protected !!