तरुण भारत

न्यूझीलंड महिला संघाच्या कर्णधारपदी सोफी डेव्हाईन

वेलिंग्टन : न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाच्या कायमस्वरुपी कर्णधारपदी सोफी डेव्हाईनची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा गुरुवारी क्रिकेट न्यूझीलंडतर्फे करण्यात आली. त्याचप्रमाणे ऍमी सॅथर्टवेट हिची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. गेल्या वषी सॅटरवेटने आपल्या पहिल्या बाळंतपणासाठी बरेच दिवस रजा घेतली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंड संघाचे नेतृत्व ली ताहुहूने केले होते. मात्र, प्राथमिक फेरीतच न्यूझीलंड महिला संघाचे आव्हान संपुष्टात आले होते. क्रिकेट न्यूझीलंडने सॅटरवेटला तिच्या पहिल्या बाळंतपणासाठी काही महिन्यांची रजा मंजूर केली होती. ही रजा संपल्यानंतर ती पुन्हा आपले पुनरागमन करणार असून तिच्याकडे उपकर्णधारपद सोपविण्यात आले आहे. पुढील वषीच्या फेब्रुवारी-मार्च दरम्यान न्यूझीलंडमध्ये होणाऱया महिलांच्या आयसीसी विश्वचषक वन डे स्पर्धेसाठी न्यूझीलंड महिला संघाचे नेतृत्व डेव्हाईनकडे सोपविण्याचा निर्णय झाला आहे.

जागतिक स्तरावर कोरोना प्रसार अद्याप होत असल्याने महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेवर साशंकतेचे सावट मात्र निश्चित राहील. गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत सोफी डेव्हाईन हिची फलंदाजीची कामगिरी दर्जेदार होत असून तिने बऱयाच धावा सातत्याने जमविल्या आहेत. टी-20 प्रकारात सलग पाच अर्धशतके झळकविणारी ती न्यूझीलंडची पहिली महिला क्रिकेटपटू आहे. तिने हा पराक्रम दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केला होता. न्यूझीलंड क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय स्तरावर येत्या सप्टेंबरअखेरीस पुनरागमन होणार आहे. न्यूझीलंडचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर जाणार असून या दौऱयात तीन वन डे आणि तीन टी-20 सामने खेळविले जाणार आहेत. पुढील आठवडय़ापासून लिन्कन येथे न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाचा सराव सुरू होणार आहे.

Advertisements

Related Stories

गोलंदाजी न करणारा हार्दिक पंडय़ा अष्टपैलू कसा?

Patil_p

…यामुळेच वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान भारताला हरवू शकलेला नाही!

Patil_p

विराट कोहलीला शेवटच्या तीन कसोटी हुकणार

Patil_p

कोलेस्निकोव्हचा नवा विश्वविक्रम

Patil_p

बेल्जियमची रशियावर एकतर्फी मात

Patil_p

भारतीय नौकानयनपटूंचा विदेशी दौरा रद्द

Amit Kulkarni
error: Content is protected !!