तरुण भारत

उत्तर प्रदेशात 13 जुलै पर्यंत कडक लॉक डाऊन

ऑनलाईन टीम / लखनऊ : 


उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा कडक लॉक डाऊन करण्याची घोषणा योगी सरकारने केली आहे. यामुळे आता शुक्रवार म्हणजेच आज रात्री 10 वाजल्यापासून 13 जुलै रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत संपूर्ण लॉक डाऊन जारी करण्यात आला आहे. 

Advertisements


याबाबत अधिक माहिती देताना मुख्य सचिव राजेंद्र कुमार तिवारी यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. लोकांमध्ये जागृती करण्यासाठी चार दिवसांचा संपूर्ण लॉक डाऊन करण्यात आला आहे. 


पुढे ते म्हणाले, या लॉक डाऊनमध्ये उत्तर प्रदेशातील सर्व कार्यालये, बाजार, व्यावसायिक प्रतिष्ठाने सर्व बंद ठेवली जातील. मात्र, या काळात आरोग्य आणि चिकित्सा सेवा, आवश्यक सेवा पहिल्या प्रमाणेच सुरू राहणार आहेत. 


आवश्यक सेवांमध्ये कार्यरत असलेल्या व्यक्ती, कोरोना वॉरियर्स, स्वच्छता कर्मचारी, डोर स्टेप डिलिव्हरी करणारे कर्मचारी यांच्यावर कोणत्याही प्रकारची बंधने नसतील. 

Related Stories

अभिनेता सोनू सूद 25 हजार लोकांना देणार रमजानमध्ये भोजन

prashant_c

व्याजदर कपातीचा निर्णय त्वरित मागे

Amit Kulkarni

पत्रकारांचे शरद पवारांना साकडे

Abhijeet Shinde

वाढत्या तापमानात घटते कोरोनाची शक्ती

Patil_p

अवमानाप्रकरणी भूषण यांना रुपयाचा दंड भरण्यासाठी दर्शविली तयारी

Patil_p

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ‘एम्स’ रुग्णालयात दाखल

datta jadhav
error: Content is protected !!