तरुण भारत

एड्सवर औषध सापडल्याचा ब्राझीलच्या संशोधकांचा दावा

ऑनलाईन टीम / ब्रासिलिया : 

एड्ससारख्या दुर्धर आजारावर प्रभावी औषध सापडल्याचा दावा ब्राझीलमधील फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ साओ पाउलोच्या संशोधकांनी केला आहे. लवकर या औषधाची माहिती ते जागतिक आरोग्य संघटनेला देणार आहेत. 

Advertisements

साओ पाउलोच्या संशोधकांनी नुकत्याच ऑनलाईन झालेल्या एड्स 2020 परिषदेत यासंदर्भात दावा केला आहे. या संशोधकांनी ऑक्टोबर 2012 मध्ये एचआयव्हीचे निदान झालेल्या एका एड्सग्रस्त रुग्णाला दीर्घकाळपर्यंत दर दोन महिन्यांनी अँंटिरेट्रोव्हायरल औषधे आणि निकोटिनामाईड या औषधांचे मिश्रण दिले. एका वर्षानंतर या रुग्णाची रक्त चाचणी केली असता त्याचा रिपोर्ट एचआयव्ही निगेटीव्ह आला, असे डॉ. रिकार्डो डियाज यांनी सांगितले.

संशोधकांनी या रुग्णाचे नाव गुप्त ठेवले असून, या रुग्णाने आता रुग्णाने एड्सच्या इलाजासाठीची औषधे घेणे बंद केले आहे. या प्रयोगाबाबत आणखी संशोधनाची आवश्यकता असल्याचे संशोधकांनी सांगितले. 

Related Stories

जनता राग व्यक्त करू लागल्याने शिवसेना हादरून गेली : नारायण राणे

Rohan_P

राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे झाले क्वारंटाइन

Rohan_P

छगन भुजबळांप्रमाणे देशमुख, परब यांची अवस्था अवस्था होणार-किरीट सोमय्या

triratna

सीडीसीचे आवाहन

Patil_p

ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा 57 लाख 49 हजार 007 वर

Rohan_P

रत्नागिरी जिल्ह्यात चौदा पॉझिटिव्ह रुग्ण

triratna
error: Content is protected !!