तरुण भारत

सातारा जिल्हय़ात आजपासून हाफ लॉकडाऊन

●एकाच दिवशी 48 जणांना डिस्चार्ज,
●एकुण मुक्त 934
●कराड पंचायत समितीचा अधिकारी बाधित

सातारा/प्रतिनिधी

Advertisements

जिल्हय़ात कोरोनाचा आकडा वाढत असताना इतर जिल्हय़ांप्रमाणे सातारा का स्वस्थ आहे? परदेशी कधीच संपले, पुण्या-मुंबईचे प्रवासीही कमी होत आहेत आणि आता सातारकरांना लागण होत आहे अश्यावेळी ‘पुन्हा लॉकडाऊन
किंवा ब्रेक द चेन’ असं काय तरी तातडीने करण्याची गरज होती. ‘तरुण भारत’ने या आधीच याबाबत आवाज ऊठवला होता मात्र प्रशासनाला किमान ‘अर्धी’ अक्कल सुचली अन् शुक्रवारपासून सातारा जिल्हय़ात सकाळी 9 ते 2 असा ‘अर्धा लॉकडाऊन’ पुकारण्यात आला आहे. दरम्यान, राजकिय हेतूने हा लॉकडाऊन पुकारण्यासाठी वेळ लागला असला तरी सातारा जिल्हय़ात अशीच गर्दी राहिली तर यापुढे पुर्ण लॉकडाऊन करण्यासाठी ‘तरुण भारत’ पुढे असणार आहे. काल रात्री 67 बाधितांच्या अहवालाने जिल्हय़ाला धक्का दिला असताना गुरूवारी दिवसभरात 48 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याने दिलासा मिळाला. पण रात्री पुन्हा दणका देत 51 बाधीत अहवाल आला.

शुक्रवारपासून जिल्हय़ातले व्यवहार सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंतच
‘तरुण भारत’ने मागणी केल्याप्रमाणे सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निर्णय घ्यावा लागला. कोरोनाचा कहर जिल्हय़ात होत आहे अशा वेळी काही यंत्रणा सजग करण्याची गरज होती. याबाबतच शेखर सिंह यांनी गुरूवारी आपला अधिकार वापरत संपुर्ण सातारा जिल्हय़ात शुकवारपासून सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंतच व्यवहार सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यातील अन्य काही जिह्यांमध्ये 2 तास वाढवून मिळत असताना व्यवहार हे संध्याकाळी 5 ऐवजी 7 पर्यंत होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर काही व्यापाऱयांना त्याची भणक लागली होती. मात्र राज्य शासनाच्या विविध सुचना व जिल्हय़ातली प्राप्त परिस्थीती पाहून शेखर सिंह यांना जिल्हय़ातल्या शहरी व ग्रामिण अशा दोन्ही भागात सकाळी 9 ते दुपारी 2 असेच व्यवहार सुरू ठेवण्याची अनुमती देण्यात आली आहे.

लग्नाला फक्त घरचेच
सातारा जिह्यात लग्नग्नविधी यासारख्या कार्यक्रमास जास्तीत जास्त 20 पर्यंत व्यक्तींना सामाजिक अंतर ठेऊन कार्यक्रम करण्यास परवानगी असून यामध्ये या कार्यक्रमासाठी जिह्याबाहेरील वधू, वर, वधू-वरांचे आई-वडील, सख्खे भाऊ-बहीण, सख्खे आजी-आजोबा यांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात येत आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

साताऱयात वाढत्या संख्येने चिंता
सातारा शहर व तालुक्यात बाधितांची संख्या वाढू लागल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून मोठय़ा आकडय़ांनी साताऱयात अफवांचे पीकही पसरु लागले आहे. सातारा तालुक्यात एकुण बाधितांची संख्या 250 झाली असून त्यातील 117 कोरोनामुक्त आहेत. तर सातजणांचा बळी केला आहे. सध्या उपचारार्थ 133 रुग्ण असून जिल्हा कारागृहात कोरोनाने पुन्हा शिरकाव केल्याने त्याच्या झळा पोलीस दलालाही सोसाव्या लागत आहेत.

रविवार पेठ हॉटस्पॉट
सातारा शहरात जिल्हा कारागृह हॉटस्पॉट ठरले होते. त्यानंतर शहर कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असताना मे महिन्यापासून सातारा शहरात कोरोना पुन्हा दाखल झाला आहे. आसपासच्या उपनगरांत रुग्ण आढळून येत असून रविवार पेठ हॉटस्पॉट ठरली असून पेठत पहिले दोन रुग्णानंतर गुरुवारच्या अहवालात 33 वर्षाचा पुरुष, 33 वर्षाची महिला, 50 व 41 वर्षाची महिला, 26 वर्षाचा पुरुष व 2 वर्षाचा बालक असे सहा बाधित आढळून आले आहेत. तर मल्हारपेठेतील 35 वर्षीय महिला, संगमनगर 40 वर्षाची महिला, व्यंकटपुरा पेठेतील 64 वर्षाची महिला असे बाधित आढळले असून शहरात चिंता वाढली आहे.

जिहे गावात संसर्ग साखळी
सातारा शहराबरोबरच तालुक्यातील विविध गावात रुग्ण समोर येत असून जिहे गाव हॉटस्पाट ठरले आहे. आजमितीस गावातील 45 जणांना बाधा झाली असून गुरुवारच्या अहवालात जिहे येथील 38, 60, 86, 71, 70, 23, 39 वर्षाची महिला, 75, 55, 25, 40, 38, 27 वर्षीय पुरुष, 42 वर्षाची महिला, 40 व 58 वर्षीय पुरुष या 16 रुग्णांचा समावेश आहे. ही संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. तर भरतगाववाडी येथील 28 वर्षाचा पुरुष, चोरगेवाडी येथील 21 वर्षाचा पुरुष, धावली येथील 19 वर्षाची युवती, सैदापूर, सातारा येथील 49 वर्षाची महिला येथील बाधित ग्रामीण भागात चिंता वाढवू लागले आहेत.

कराड पंचायत समितीचा अधिकारी बाधित, 15 जण क्वारंटाईन
कराड पंचायत समितीतील प्रशासकीय विभागात अधीक्षक पदावर कार्यरत असलेला 50 वर्षीय अधिकारी कोरोना बाधित असल्याचे बुधवारी रात्री स्पष्ट झाल्याने पंचायत समितीत खळबळ उडाली आहे. या घटनेतंर पंचायत समिती प्रशासनाने संपूर्ण कार्यालय सॅनिटाईज केले असून बाधिताच्या संपर्कात आलेल्या 15 सहकारी कर्मचाऱयांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.
संबंधित अधिकारी 29 जून रोजी पुणे येथे गेले होते. 30 रोजी ते परत आल्यानंतर त्यांच्या हातावर क्वॉरंटाईनचा शिक्का मारण्यात आला होता. त्याच दिवशी ते पंचायत समितीतही गेले होते. त्यांनी रितसर रजा काढून आठ दिवसांपासून ते होम क्वॉरंटाईन झाले होते. बुधवारी रात्री त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कराड तालुक्यात ऍक्टीव्ह रूग्णसंख्या कमी झाली होती. अनलॉक सुरू झाल्यानंतर पुन्हा तालुक्यात रूग्णांचा आकडा वाढत असून गुरूवारअखेर एकुण बाधित 391 असून यातील मुक्त 278 आहेत. 6 जण मयत असून उपचारात असणारी रूग्णसंख्या 107 आहे.

एकाच दिवशी 48 नागरिकांना डिस्चार्ज
रोजच्या बाधितांच्या वाढत्या आकडय़ांनी चिंतेत असणाऱया जिल्हावासियांना आज दिलासा मिळाला. जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 48 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
यामध्ये जावली तालुक्यातील आखेगणी येथील 65 वर्षीय पुरुष, 16 वर्षीय युवक, 40 वर्षीय महिला, बीरमनेवाडी येथील 52 वर्षीय पुरुष, बामणोली येथील 46 वर्षीय पुरुष, रामवाडी येथील 57, 42, 48, 43,
55 वर्षीय महिला, 48 वर्षीय पुरुष.

कोरेगाव तालुक्यातील चौधरीवाडी येथील 32 वर्षीय पुरुष, करंजखोप येथील 8 वर्षाची बालिका, जांभ खुर्द येथील 31 वर्षीय पुरुष, दुरगळवाडी येथील 23 वर्षीय पुरुष.

कराड तालुक्यातील महारुगडेवाडी येथील 21 व 46 वर्षीय पुरुष, 75 वर्षीय महिला. तारुख येथील 22, 54, 32, 35 वर्षीय महिला, 11 वर्षाचा बालक, 40 वर्षीय पुरुष, काळेवाडी येथील 8 वर्षाचा बालक, तुळसण येथील 60 वर्षीय पुरुष, गोळेश्वर येथील 46 वर्षीय पुरुष, उंब्रज येथील 47 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, मलकापूर येथील 1 पुरुष.

खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील न्यू कॉलनी येथील 60 वर्षीय महिला, येलगाव येथील 65 वर्षीय पुरुष, हिंगणोली येथील 54 वर्षीय पुरुष, बनवडी येथील 32 वर्षीय पुरुष.

वाई तालुक्यातील धरमपुरी येथील 35 वर्षीय पुरुष. सातारा तालुक्यातील दौलतनगर येथील 39 वर्षीय पुरुष, रेल्वेस्टेशन येथील 32 वर्षीय पुरुष, लिंब येथील 40 वर्षीय पुरुष. पाटण तालुक्यातील उरुल येथील 30 वर्षीय पुरुष, बोंद्री येथील 34 वर्षीय पुरुष, सांगवड येथील 31 वर्षीय पुरुष. फलटण रविवार पेठ येथील 68, 25, 62, 60 वर्षीय महिला, जिंती येथील 44 वर्षीय महिला, गुणवरे येथील 51 वर्षीय पुरुष, आदरुड येथील 35 वर्षीय पुरुष यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. रिकव्हरी रेट चांगला असल्याने मुक्तांचा आकडा हजाराकडे झेपावत असून एकुण 934 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

523 जणांचे नमुने तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 22, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 71, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 57, ग्रामीण रुग्णालय फलटण येथील 20, कोरेगाव येथील 27, वाई येथील 40, शिरवळ येथील 92, रायगाव येथील 23, पानमळेवाडी येथील 42, मायणी येथील 9, महाबळेश्वर येथील 13, पाटण येथील 79, खावली येथील 28 असे एकूण 523 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, असेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.

जिल्हय़ात गुरूवारी
एकुण बाधित 51
एकुण मुक्त 48
बळी 00

जिल्हय़ात गुरूवारपर्यंत
घेतलेले एकुण नमुने 16572
एकुण बाधित 1543
घरी सोडण्यात आलेले 934
मृत्यू 61
उपचारार्थ रुग्ण 548

Related Stories

सातारा जिल्ह्यात नवे 28 कोरोनाबाधित, 296 नागरिकांना दिला डिस्चार्ज

Abhijeet Shinde

बहुमत आहे तर घाबरता का? विधानसभा अध्यक्ष निवडीवरुन फडणवीसांचं ठाकरे सरकारला आव्हान

Abhijeet Shinde

दरोडाप्रकरणी पाच जण अटकेत

datta jadhav

डीमार्टमध्ये जाणाऱयांची केली जातेय कोरोना टेस्ट

Patil_p

महाराष्ट्रात 2,585 नवीन कोरोनाबाधित; 40 मृत्यू

Rohan_P

ग्रेड सेपरेटर तात्काळ सुरु न केल्यास आंदोलन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!