तरुण भारत

कानपूर एन्काऊंटरवरून कोणीही राजकारण करु नये : संजय राऊत

ऑनलाईन टीम / मुंबई :

उत्तर प्रदेश पोलिसांनी कुख्यात गुंड विकास दुबेला ठार करण्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले, देशात पोलिसांची भीती कमी झाली तर गुंडाराज येईल. त्यामुळे खाकीवर्दीची भीती राहिले पाहिजे असे म्हणत कानपूर एन्काऊंटरवरून कोणीही राजकारण करू नये, असे राऊत यांनी म्हटले आहे. 

Advertisements


राऊत म्हणाले, विकास दुबे एका दिवसात मोठा झालेला नाही. विकास दुबे यांच्या मागे अनेक वर्ष राजकीय पाठबळ आहे. आता गुन्हेगारीचे राजकारण होत चालले आहे. इतकी वर्ष विकास सारखा गुन्हेगार वाढला त्याला जबाबदार कोण? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.


कानपूर मध्ये झालेल्या एन्काऊंटरवर प्रश्न उपस्थित करु नये असे सांगत पुढे ते म्हणाले अशा शंका उपस्थित करणे म्हणजे पोलिसांचे खच्चीकरण केल्यासारखे होईल. पोलिसांनी फक्त आपल्या सहकाऱ्यांच्या शहीदत्वाचा बदला घेतला असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.  

Related Stories

आर्थिक मंदीचा फटका जवानांनाही; थकले 2 महिन्यांचे भत्ते

prashant_c

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदीचे आदेश

datta jadhav

“मुख्यमंत्र्यांनी शरिया राजवट जारी करणे बाकी ठेवले आहे”

Abhijeet Shinde

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन

Rohan_P

पत्रकार परिषदेत का रडले चंद्राबाबू नायडू, नेमकं कारण काय?

Abhijeet Shinde

भारतात कोरोनावर लस तयार, मानवी चाचणीला होणार सुरुवात

datta jadhav
error: Content is protected !!