तरुण भारत

पंतप्रधान मोदींनी केले आशियातील सर्वात मोठ्या सौर प्रकल्पाचे उद्घाटन

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

मध्यप्रदेशातील रेवा येथे असलेल्या 750 मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आज उद्घाटन केले. 

Advertisements

आशियातील हा सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प आहे. रेवा येथे 1590 एकर जागेत प्रत्येकी 250 मेगावॅट क्षमतेचे तीन सौरऊर्जा प्रकल्प आहेत. या प्रकल्पातून जानेवारी 2020 मध्ये वीजनिर्मितीला सुरुवात झाली. मध्य प्रदेश ऊर्जा विकास निगम आणि भारताचे सौरऊर्जा निगम संयुक्तपणे हा प्रकल्प चालवत आहेत. तीन खासगी कंपन्याही प्रकल्पात कार्यरत आहेत. 

या प्रकल्पातून मध्य प्रदेशमधील डिस्कॉम कंपनीला 76 टक्के वीज पुरवठा होणार आहे. तर दिल्ली मेट्रोला 24 टक्के वीजपुरवठा केला जाणार आहे. हा वीजपुरवठा 2.97 रुपयांनी होणार आहे. या प्रकल्पामुळे 15 लाख टन कार्बन डायऑक्साइडचे प्रदूषण टळणार आहे. प्रदूषण कमी करून ऊर्जेची मोठी गरज पूर्ण करणारा हा प्रकल्प असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले.

Related Stories

ओमिक्रॉन घेत आहे डेल्टाची जागा

Patil_p

आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर अखबार में’ टाटा

Patil_p

केंद्रीय महिला आयोगाने संजय राऊतांची चौकशी करावी: चंद्रकांत पाटील

Abhijeet Shinde

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे ट्विटर अकाऊंट हॅक

datta jadhav

भाजपचे खासदार कपिल पाटील यांना कोरोनाची लागण

Rohan_P

कॅलीस, झहीर अब्बास, स्थळेकर यांचा आयसीसी हॉल फेममध्ये समावेश

Patil_p
error: Content is protected !!