तरुण भारत

महाराष्ट्रात 10 वीचा निकाल 31 जुलैपर्यंत, तर 12 वीचा 15 ते 20 जुलै दरम्यान

ऑनलाईन टीम / हिंगोली : 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीचे निकाल लावण्यास विलंब झाला आहे. मात्र, आता हे निकाल लवकरच लावले जातील अशी माहिती हिंगोली दौऱ्यावर असलेल्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली. 

Advertisements


त्या म्हणाल्या, बारावीचा निकाल 15 ते 20 जुलै या कालावधीत तर दहावीचा निकाल 31 जुलै पर्यंत जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. दहावी बारावीच्या परीक्षांचे निकाल करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. 


दरम्यान, यंदा मार्च दहावी परीक्षेसाठी 17 लाख 65 हजार 898 आणि बारावीसाठी 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी बसले होते. बारावी सर्व पेपर लॉक डाऊनपूर्वी संपले होते. मात्र, दहावीचा शिल्लक राहिलेल्या भूगोलचा पेपर रद्द करण्यात आला होता. 

Related Stories

क्वांरंटाईन झोन कचरा विघटन करत पालिकेडून नागरिकांच्या आरोग्याची दक्षता

triratna

विधीमंडळाबाहेर भाजपने भरवली प्रति विधानसभा ; फडणवीसांनी मांडला आघाडी सरकारविरोधात धिक्कार प्रस्ताव

triratna

येडियुरप्पा यांचे पंतप्रधानांना दरमहा १.५ कोटी लसीचे डोस देण्याचे आवाहन

triratna

सचिन वाझेंना हृदयविकाराचा त्रास; खासगी रूग्णालयात उपचार घेण्यास न्यायालयाची परवानगी

Rohan_P

वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास सर्जरी

triratna

पुण्यातील गोल्डमॅन सम्राट मोझे यांचे निधन

Rohan_P
error: Content is protected !!