तरुण भारत

‘त्या’ वृद्ध दाम्पत्याच्या मदतीसाठी धावले तहसीलदार

प्रतिनिधी / बार्शी

बार्शी तालुक्यातील धामणगाव दुमाला येथील वयोवृद्ध शेतकरी नरहरी ढेकणे वय 87 व त्यांची वृद्ध पत्नी सोजर ढेकणे हे दोघे आपल्या शेतात स्वतः बनवलेल्या पेरणी अवजाराने दुबार पेरणी करीत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यात वृद्ध पत्नी पेरणी नांगर ओढत होती आणि वृद्ध पती बी बियाणे सोडत आहे. या दोघांना कोणी वारस नसल्याने ते स्वतः आपल्या शेतात राबत आहेत आणि आपली उपजीविका भागवत आहेत. हा व्हिडीओ वाऱ्याप्रमाणे व्हायरल झाल्याने त्या वृद्ध दाम्पत्य बाबत सहानुभूती व्यक्त होती. ही बाब बार्शी तहसीलदार प्रदिप शेलार यांना समजल्यानंतर ते आपल्या इतर अधिकारी यांचे समवेत थेट त्या वृद्ध शेतकरी यांच्या बांधावर पोहोचले.

आणि दुबार पेरणी केलेल्या शेतात बसून त्यांची विचारपूस केली. दरम्यान, विविध शासकीय योजनांची पडताळणी करून सोजर ढेकणे यांना श्रावणबाळ योजनेचा लाभ देण्यासंदर्भात कार्यवाही केली. सुरवातीला पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याने सोयाबीनची दुबार पेरणी करण्याची वेळ या दाम्पत्यावर आली. काळ्या आईची दुसऱ्यांदा ओटी भरण्यासाठी पत्नीने चक्क औत ओढले तर पतीने चाढ्यावर मूठ ठेवून पेरणी केली. ढेकणे दाम्पत्याला राहण्यासाठी पक्के घर नसल्याने घरकुल योजनेच्या संदर्भाने गटविकास अधिकारी शेखर सावंत यांना निर्देश दिले.

तसेच अंत्योदय अन्नधान्य योजनेअंतर्गत त्यांच्याकडे धान्य सुपूर्द केले. प्रशासनाच्या वतीने शासकीय अवजारांचा लाभ देण्यासंदर्भात विचारणा केली असता नरहरी ढेकणे यांनी आपण अवजारे वापरण्यासाठी शारीरिक दृष्टीने असक्षम असल्याचे सांगितले. वयोवृद्ध जोडप्याला या वयात अंगमेहनतीचे काम करावे लागणे दुर्दैवी असल्याची भावना या वेळी शेलार यांनी व्यक्त केली. या वेळी कृषी सहाय्यक संभाजी पाटील, पोलिस पाटील गणेश मसाळ, माणिक गाडे उपस्थित होते.

Related Stories

सोलापूर ग्रामीणमध्ये 188 नवे कोरोनाबाधित

Abhijeet Shinde

करवीर पश्चिम भागात एटीएम मोबाईल व्हॅनचे कार्य कौतुकास्पद

Abhijeet Shinde

कोल्हापूर : कोरोनाचे आठ बळी, २३६ पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

घरफोडी करणाऱ्या तरुणास अटक

Abhijeet Shinde

शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत स्वप्नांची राख; सहा एकर ऊस जळून लाखों रूपयांचे नुकसान

Sumit Tambekar

हातकलंगलेमधील कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या 30 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!