तरुण भारत

मालकापुरात पाच दिवस जनता कर्फ्यू

शाहुवाडी/ प्रतिनिधी

मलकापूर   बाजार पेठेत वाढणारी गर्दी व संभाव्य कोरोनाचा  वाढता प्रभाव लक्षात घेऊन मलकापूर शहरात सोमवार 13 जुलै ते शुक्रवार 17 जुलै अखेर  जनता संचारबंदी जाहीर केली आहे मलकापूर नगर परिषदेत व्यापारी व पालिका प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवले जाणार आहेत. या जनता संचारबंदीला परिसरातील नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहनही करण्यात आले आहे.

मलकापूर  नगर परिषद येथे नगराध्यक्ष अमोल केसरकर , उपनगराध्यक्ष प्रवीण प्रभावळकर  नगरसेवक दिलीप पाटील , रमेश चांदणे, मुख्याधिकारी शीला पाटील यांच्यासह शहरातील व्यापारी यांच्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  शाहूवाडी तालुक्यात पुणे-मुंबई या ठिकाणावरून आलेल्यांची तपासणी केल्यानंतर कोरोनाची संख्या  वाढू लागली होती. परिणामी कोरोनाची धास्ती  सर्वत्र दिसत होती लॉक डाऊन उठल्या नंतर मलकापूर बाजारपेठेत गर्दी वाढू लागली आहे त्यातच कोरोना बाबत घ्यावयाच्या दक्षतेचा ही पुरता बोज वारा उडाला आहे.  मास्कचा वापर ही बहुतांशी पणे टाळला जात आहे तर सोशल डिस्ट्रक्शन चाही फज्जा उडत आहे.

कोरोनाचा संभाव्य धोका ओळखून मलकापुर शहरात कोरोनाचा  शिरकाव होऊ नये याची खबरदारी म्हणून मलकापूर शहरातील व्यापारी यांची मलकापूर नगरपरिषदेत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शहरात वाढती गर्दी लक्षात घेता त्याच बरोबर कोरोना बाबतच्या घ्यावयाच्या दक्षतेचा उडत असलेला बोजवारा याबाबत खबरदारी म्हणून मलकापूर शहरात सोमवार 13 जुलै ते शुक्रवार 17 जुलै अखेर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.
 
कडक कारवाई गरजेची
दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता घ्यावयाच्या दक्षतेचा पूर्णता बोजवारा उडाला आहे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडत असताना बहुतांश नागरिक मास्कचा वापर टाळला जात आहे मलकापूर शहर बाजारपेठ असल्याने याठिकाणी मास्कचा वापर न करता येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अशा नागरिकांवर नगर परिषद प्रशासनाने कारवाई करणं गरजेचं आहे. एकूणच लॉक डाऊन उठल्यानंतर पुन्हा एकदा पाच दिवस मलकापूर शहरात जनतेतूनच पुढे आलेला जनता संचार बंदीला मलकापूर पंचक्रोशीतील नागरिकांनी ही दक्षता म्हणून सहकार्य गरजेच आहे

Advertisements

Related Stories

कोल्हापूर : कोगे अपघाती वळणावर लावले दिशादर्शक फलक

Abhijeet Shinde

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पूर्ण ताकतीने लढा

Patil_p

यंदा शाही दसरा सोहळा होणार

Abhijeet Shinde

बोलोली येथील अपघातात सातार्डेची महिला जागीच ठार

Sumit Tambekar

बार्शीत मद्यपींचा दारू पिण्याचा परवाना काढण्याकडे कल

Abhijeet Shinde

औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण तातडीने करा; संभाजीराजेंची मागणी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!