तरुण भारत

घरांची विक्री एप्रिल-जूनमध्ये 67 टक्क्मयांनी घटली

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

कोरोना विषाणूच्या महामारीमुळे आणि त्याच्यासोबत सुरु असणाऱया लॉकडाऊनमुळे नऊ प्रमुख शहरांमध्ये घरांची विक्री 67 टक्क्यांनी घटून 21,294 युनिट्वर राहिली आहे, अशी माहिती डाटा विश्लेषण फर्म प्रॉपइक्विटीच्या निरिक्षणामधून सांगितले आहे.

एप्रिल ते जून 2020 च्या दरम्यान एकूण घरांची विक्री 21,294 युनिट्वर राहिली आहे. जी एक वर्षाच्या अगोदरच्या कालावधीत 64,378 इतकी राहिली होती. यामध्ये ही घसरण 67 टक्क्मयांवर राहिली आहे. उपलब्ध अहवालाच्या माहितीनुसार नोएडासोडून अन्य सर्व आठ शहरांमध्ये घरांची विक्री घटली आहे. गुरुग्राममध्ये ही विक्री 791 टक्क्मयांनी घटली आहे आणि मागील वर्षातील समान काळात 1,707 ने घटून 361 वर राहिली आहे.

यासोबतच चेन्नई आणि हैदराबादमधील घरांची विक्री 74 टक्क्मयांनी घसरली आहे तर बेंगळूरमधील विक्री 73 टक्क्मयांनी घसरली आहे. यामध्ये मुंबईमधील घरांची विक्री 63 टक्के, ठाण्यात 56 आणि पुण्यात 70 टक्क्मयांनी घटली आहे. याच दरम्यान नोएडामध्ये मात्र विक्रीत नोंदली गेली आहे. नोएडात विक्री पाच टक्क्मयांनी वधारत 1,177 राहिली आहे. 

Related Stories

बाजारातील चार सत्रातील तेजीचा प्रवास थांबला

Patil_p

बीएसएनएलकडून फोनवर मोफत टीव्ही सुविधा

tarunbharat

चढउताराच्या प्रवासानंतर बाजार बंद

Patil_p

बायोकॉनचा डीकेएसएचसोबत करार

Patil_p

ऑटो डीलर्सची 300 शोरुम्स बंद

Patil_p

चिनी मोबाईल्सच्या वर्चस्वाला फटका

Omkar B
error: Content is protected !!