तरुण भारत

चारही चेकपोस्टवर आरोग्य पथके

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क : जिल्हय़ाबाहेरून येणाऱयांची तपासणी

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

Advertisements

गणेशोत्सव कालावधीत उद्भभवणारे साथरोग आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हय़ाची आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. जिल्हय़ातील प्रमुख चार चेकपोस्टवर आरोग्य पथके तैनात करून जिल्हय़ाबाहेरून येणाऱयांची तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे यांनी शुक्रवारी जि. प. आरोग्य समिती सभेत दिली.

ही सभा सभापती सावी लोके यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात झाली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खलिपे, निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अविनाश नलावडे, सदस्य प्रितेश राऊळ, हरी खोबरेकर, लॉरेन्स मान्येकर, शर्वाणी गावकर, नूतन आईर आदींसह खातेप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.

गणेशोत्सवाला 22 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. यासाठी जिल्हय़ात मोठय़ा संख्येने जिल्हय़ाबाहेरील चाकरमानी येण्याची दाट शक्मयता लक्षात घेऊन त्यांच्याकरवी जिल्हय़ात साथीचे रोग पसरू नयेत, याबाबत खबरदारी घेण्यासाठी जिल्हय़ाची आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. गणेशोत्सव कालावधीत कोरोना, डेंग्यू, मलेरिया, लेप्टो यासारख्या साथ रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून जिल्हय़ाबाहेरून येणाऱया नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी खारेपाटण, करुळ, फोंडाघाट, आंबोली या प्रमुख चार चेकपोस्टवर आरोग्य पथके तैनात करण्यात येणार आहेत. तसेच त्या ठिकाणी आवश्यक मेडिसिनसह डेटा एन्ट्री ऑपरेटर नियुक्त करण्यात येणार आहेत. जेणेकरून तपासणीदरम्यान आढळलेल्या संशयित रुग्णांची माहिती तात्काळ संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्यात येणार आहे, अशी माहिती खलिपे यांनी दिली.

राज्यात कोरोनाचे संकट असताना आपला जीव धोक्मयात घालून ज्या आरोग्य कर्मचाऱयांनी काम केले, अशा कर्मचाऱयांच्या पगारात शासनाने 25 टक्के कपात केली. याबाबत सदस्य प्रीतेश राऊळ यांनी सभागृहाचे लक्ष वेधत तीव्र नाराजी व्यक्त केली. जीव धोक्मयात घालून काम करणाऱया कर्मचाऱयांना शासनाने वाढीव पगार जाहीर करावा, अशी मागणीचा ठराव सभेत घेण्यात आला.

साथरोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्हय़ातील 222 गावे जोखीमग्रस्त म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. तसेच जिल्हय़ाबाहेरून आलेल्या 340 गरोदर मातांची विशेष नोंद करून प्रसुतीवेळी अधिक खबरदारी घेण्यात येणार आहे, अशी माहिती सभेत देण्यात आली.

Related Stories

तब्बल 29 हजार ग्राहक अनिश्चित काळासाठी अंधारात

Patil_p

उद्ध्वस्त चिपळूणच्या उभारणीसाठी सर्वांनी पुढे यावे

Patil_p

‘चिंतामणी’ येतोय, ‘चिंता मनी’ येतेय

NIKHIL_N

‘कोविड’साठी नियुक्त नर्स, डॉक्टरना ‘नारळ’

NIKHIL_N

बाजारपेठेतील परप्रांतियांच्या शिरकावाबाबत चिंता

NIKHIL_N

आरोग्य केंद्रांचे होणार ‘फायर ऑडिट’

NIKHIL_N
error: Content is protected !!