तरुण भारत

डॉक्टर तरुणीला कोरोना, सिव्हिल हॉस्पिटलमधील व्यवस्था कोलमडली

मेडीकल ओपीडी बंद, गैरप्रकार, मनमानीमुळे  बिम्स् प्रशासनावर नाराजी

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

सिव्हिल हॉस्पिटलमधील मेडीकल ओपीडीमध्ये सेवा बजावलेल्या एका 23 वषीय डॉक्टर तरुणीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे शुक्रवारी मेडीकल ओपीडी विभाग बंद ठेवण्यात आला होता. सिव्हिलमधील वैद्यकीय व्यवस्था कोलमडली असून गैरकारभार आणि मनमानीच्या प्रकारामुळे ज्युनिअर डॉक्टरांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमधील वैद्यकीय कर्मचारी, ज्युनिअर डॉक्टर, परिचारीकेंचे योगदान मोठे आहे. आणीबाणीचा प्रसंग असूनही वरि÷ व तज्ञ डॉक्टर इकडे फिरकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. केवळ परिचारीका व ज्युनिअर डॉक्टरांवर भार टाकून कोरोना बाधितांवर उपचार केले जात आहेत. त्यामुळेच ते बिम्स् प्रशासनावर नाराज झाले आहेत.

केवळ आठवडय़ाभरात दोन डॉक्टर तरुणी, एक एक्सरे टेक्नीशियन व एका परिचारीकेला कोरोनाची लागण झाली आहे. खरे तर त्यांना स्वतंत्र विभागात ठेवून त्यांच्यावर उपचार करण्याची गरज होती. मात्र बिम्स् प्रशासनाला सर्वसामान्य रुग्णांबरोबरच या चार कोरोना योध्दय़ांवर उपचार सुरु केले आहेत. त्यामुळे डॉक्टर प्रशासनावर पार भडकले आहेत.

Related Stories

महापालिकेसमोर लाल-पिवळा रंगाचा ध्वज

Patil_p

पंधरा लाखांच्या ऐवजावर चोरटय़ांचा डल्ला

Patil_p

चेनस्नॅचिंगच्या घटनेने खळबळ

Patil_p

केदनूर ग्राम पंचायतीसमोर अनेक आव्हाने

Patil_p

विरोधी पक्षनेत्यांना अडविणाऱया पोलिसांवर कारवाई करा

Omkar B

तापमान वाढले… पारा 37 अंशावर

Patil_p
error: Content is protected !!