तरुण भारत

बागलकोट जिल्हय़ात 6 जणांना बाधा

वार्ताहर/ जमखंडी

बागलकोट जिल्हय़ात शुक्रवार दि. 10 रोजी आणखी 6 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने एकूण बाधित संख्या 355 वर पोचली. यात 150 बरे होऊन घरी परतले असून सध्या 196 रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी कॅप्टन डॉ. के. राजेंद्र यांनी दिली.

Advertisements

बागलकोट तालुक्मयातील मुचखंडी तांडा 1, इलकल नगर 3, बागलकोट नवनगर 1, कलादगी 1 असे एकूण 6 जणांना बाधा झाल्याचा अहवाल आला.

मुचखंडी तांडय़ातील 47 वर्षांचा पुरुष (रुग्ण क्रमांक 14674) च्या प्राथमिक संपर्काने 58 वर्षांचा पुरुष (रुग्ण क्रमांक 28327) च्या प्राथमिक संपर्काने 35 वर्षांची महिला व 57 वर्षांचा पुरुष यांना कोव्हिड बाधा झाली. बागलकोट नवनगर येथील 70 वर्षांची वृद्धा (रुग्ण क्रमांक 15301) च्या प्राथमिक संपर्काने कलादगी येथील 30 वर्षाच्या युवकाला संसर्ग झाला.

अद्याप 1882 नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. एकूण 16468 नमुन्यांपैकी 14132 निगेटिव्ह, 355 पॉझिटिव्ह, 9 मृत्यू, 150 बरे झाले तर 196 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कंटेनमेंट झोन 34 आहेत. 4553 क्वारंटाईनमधून मुक्त झाले आहेत.

Related Stories

संकेश्वरमध्ये राखीव पोलीस दल तैनात

Rohan_P

कोविड नियमांचे पालन करत बकरी-ईद साजरी करण्याचे आवाहन

Amit Kulkarni

कै. रावसाहेब गोगटे टॉप टेन करेला स्पर्धा शुक्रवारी

Amit Kulkarni

हुन्नूर येथे मृतदेह ठेवून निदर्शन

Patil_p

सुरळीत पाणीपुरवठय़ासाठी अजून दोन दिवस लागणार

Patil_p

बुधवारी कोरोनाचे 24 नवे रुग्ण

Omkar B
error: Content is protected !!