तरुण भारत

टक्केवारी मागणारे जि.पं.सहाय्यक अभियंते पाप कोठे फेडणार?

तालुका पंचायतमध्ये उदय सिद्दण्णावर यांनी मांडल्या सरकारी शाळांच्या व्यथा

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

मागीलवषी आलेल्या महापूरामुळे अनेक शाळांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. विशेष करुन ज्या शाळा कौलारु आहेत त्यांची अवस्था गंभीर बनली आहे. त्यामुळे केंद्रिय शासनाकडून एक विशेष निधी देण्यात आला होता. या निधींचा सरकारी शाळांना योग्य उपयोग व्हावा व त्याचा त्रास विद्यार्थ्यांना होवू नये यासाठी ज्या शाळांची कौले फुटली आहेत, त्या ठिकाणी पत्रे घालण्याचे सांगण्यात आले होते. मात्र जिल्हा पंचायतीच्या सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांनी या फंडाचा दुरुपयोग केल्याचा आरोप तालुका पंचायच्या सभागृहात करण्यात आला. त्याचवेळी आम्ही त्यांना टक्केवारी घ्या पण योग्य काम करण्यासाठी आम्हाला एक संधी द्या, अशी मागणी केली होती. या मागणीला त्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या. विद्यार्थ्यांच्या सुरिक्षततेसाठी दखल न घेणारे अधिकारी पाप कोठे फेडणार? असा सवालही सिद्दण्णावर यांनी तालुका पंचायत सभागृहात उपस्थित केला.

कडोली, गुंजेनहट्टी, जाफरवाडी येथील सरकारी शाळांवरील कौले खराब झाली होती. यासाठी गुंजेनहट्टी शाळेला 2 लाख रुपये तर कडोली शाळेला 5 लाख रुपये आले होते. यामधून शाळांना पत्रे घालण्याचे काम करण्यात आले. मात्र उदय सिद्दण्णावर यांनी जर हे पत्रे घातल्यास उन्हात उष्म्याने तर पावसाळय़ात पडणाऱया पावसामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागणार या हेतुने तुमची टक्केवारी काढुन उर्वरित रक्कम आम्हाला द्या. आपल्या माजी विद्यार्थी संघटनेकडून टाटासीटचे पत्रे लाभदायी ठरणार आहेत. जर रक्कम कमी असेल तर आम्ही सर्व जण ती घालून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची योग्य सोय करु, असे सांगितले होते.

मात्र याकडे गांभीर्याने लक्ष न देता राजकारण घालून साधेपत्रे घालण्यात आले आहेत. त्यामध्ये देखील गळती लागू झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात घालण्याचेच हे काम आहे. यासाठी आम्ही अनेक वरि÷ अधिकाऱयांना  निवेदनही दिले आहेत. मात्र याकडे गांभीर्याने पाहिले नाही. उलट केंद्र सरकारच्या निधी असून नको त्यांच्याकडून उद्घाटन करण्यात आले आहे. जर टाटाचे नवीन आलेले पत्रे घातले असते तर उन्हात उष्म्याचा व पावसात आवाजाचा त्रास होणार नाही. याकडे सिद्दण्णावर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. यावर तालुका शिक्षणाधिकाऱयांना धारेवर धरण्यात आले.

टक्केवारी घेवून देखील विद्यार्थ्यांना टाटा थर्मल कॉल हे तीन इंचाचे पत्रे घातल्यास कायम स्वरुपी तोडगा निघणार होता. मात्र याकडे कोणत्याच अधिकाऱयांनी लक्ष दिले नाही तर उलट पातळ पत्रे घालून काम आटोक्मयात आणण्यात आले आहे. त्यामुळे यामध्ये किती टक्केवारी मिळाली? असा सवाल उपस्थित करण्यात आला. यावेळी सरकारी शाळांसाठी माजी विद्यार्थी संघटनेने खर्च करण्याची तयारी दाखविली असताना देखील घाईगडबडीने काम का करण्यात आले? असा सवाल सिद्दण्णावर यांनी उपस्थित केला. यामुळे तालुका शिक्षणाधिकारी जुट्टण्णावर यांनी एकही शब्द न बोलता वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. याकडे आता संबंधित अधिकाऱयांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

Related Stories

महात्मा फुले मार्केट खुले करा परिसरातील व्यापाऱ्यांची मागणी

Rohan_P

‘त्या’ पाच जणांचा अद्याप थांगपत्ता नाही

Amit Kulkarni

कंग्राळीतील मराठी शाळेची इमारत होणार दुमजली

Omkar B

व्हॅक्सिन डेपोत झाडे लावा; मात्र तोडलेल्या झाडांना हात लावायचा नाही!

Amit Kulkarni

नैऋत्य रेल्वे मार्गावर धावल्या 157 पार्सल रेल्वे

Patil_p

संकेश्वर नगराध्यक्ष निवड 27 रोजी

Patil_p
error: Content is protected !!