तरुण भारत

बार असोसिएशनच्या अध्यक्षांशी पोलिसाने घातली हुज्जत

प्रतिनिधी/ बेळगाव

कार पार्किंग करत असताना बार असोसिएशनच्या अध्यक्षांनाच पोलिसांनी अरेरावीची भाषा वापरली. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. त्यानंतर पुन्हा दुपारी अध्यक्षांना अरेरावीची उत्तरे दिली. यामुळे संतप्त झालेल्या वकिलांनी न्यायालयासमोर मुख्य रस्त्यावरच ठाण मांडले. यामुळे एकच गोंधळ उडाला. शेवटी उध्दट उत्तरे देणाऱया पोलिसांना बोलावून घेवून माफी मागण्यास भाग पाडले. त्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला आहे.

Advertisements

सध्या कोरानामुळे न्यायालयाच्या आवारात वाहने पार्किंग करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे वकिलांना रस्त्यावरच चारचाकी व दुचाकी वाहने पार्किंग करावी लागत आहेत. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी आणि न्यायालय परिसरात पार्किंग करण्यासाठी जागाच नसल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. उच्च न्यायालयाने पार्किंगवर निर्बंध घातले आहेत हे खरे असले तरी स्थानिक पातळीवर ही समस्या दूर करणे गरजेचे आहे.

शुक्रवारी बार असोसिएशन अध्यक्ष ए. जी. मुळवाडमठ हे आपली कार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारासमोर पार्किंग करत होते. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना अपशब्द वापरला. एकेरी भाषेत त्यांना उत्तरे दिली. त्यानंतर मुळवाडमठ यांनी न्यायालयाच्या इमारतीला लागूनच आपली कार पार्किंग केली आणि ते कामासाठी ते न्यायालयात गेले. त्यानंतर परत आले असता पुन्हा त्या पोलिसाने त्यांच्याशी हुज्जत घातली. यामुळे संतप्त झालेल्या वकिलांनी पोलिसांच्या विरोधात आंदोलन छेडले. त्या पोलिसाने माफी मागितली तरच आम्ही आमचे आंदोलन मागे घेवू, असा इशारा दिला. यामुळे शेवटी संबंधित पोलिसाला बोलावून माफी मागितल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला आहे. या घटनेमुळे बराच उशीर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. याचबरोबर वाहतुकीची कोंडीही झाली होती. यावेळी वकील मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

चंद्रशेखर इंडी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Patil_p

अंगणवाडी कर्मचारी महिलांचा पुन्हा एल्गार

Patil_p

कर्नाटक: बेळगावचा रुग्ण बरे होण्याचा दर सर्वात कमी

Abhijeet Shinde

शशिकला जोल्लेंना धर्मादाय, कत्तींना अन्न-नागरी पुरवठा

Patil_p

अलोन्स स्पोर्टस, सहारा स्पोर्टस विजयी

Patil_p

बेळगावात कोविड आइसोलेशन केंद्र सुरु करा : भाजप नेते किरण जाधव यांची मंत्री जगदीश शेट्टर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!