तरुण भारत

लॉकडाऊननंतर विमान प्रवाशांनी गाठला 15 हजारांचा टप्पा

प्रतिनिधी/ बेळगाव

लॉकडाऊनची नियमावली सरकारने शिथिल केल्यानंतर बेळगाव विमानतळावरून विमानसेवा पूर्ववत करण्यात आली. 25 मे पासून सुरू करण्यात आलेल्या विमानसेवेला प्रवाशांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. त्यामुळेच या कोरोनाच्या काळातही अवघ्या 46 दिवसांमध्ये 15 हजारांहून अधिक प्रवाशांनी विमानप्रवास केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

बेळगावमधून बेंगळूर व अहमदाबाद या शहरांना मे अखेरपासून सेवा सुरू करण्यात आली. त्यानंतर एका-एका शहराची त्यामध्ये भर पडत गेली. सध्या बेळगावमधून 7 शहरांना विमानसेवा सुरू आहे. बेंगळूर, मुंबई, पुणे, हैद्राबाद, अहमदाबाद, अजमेर व इंदूर या शहरांना विमानसेवा सुरू आहे. मुंबई, पुणे, हैद्राबाद या शहरांना चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.

गुरुवारी सर्वाधिक विमान फेऱया

दररोज विमानप्रवास करणाऱया प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांमधून येणाऱया प्रवाशांना 14 दिवस होम क्वारंनटाईन करण्याचा निर्णय कर्नाटक राज्य सरकारने घेतल्याने प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. गुरुवारी एका दिवसात सांबरा विमानतळावर 17 विमानांची ये-जा होती. एकूण 8 विमाने आली तर 9 विमानांचे उड्डाण झाले.

Related Stories

खानापुरातील कार्यालयात निवडणुकीनंतर शुकशुकाट

Omkar B

कडोली दूरदुंडेश्वर मठाच्या जीर्णोद्धाराचा निर्णय

Amit Kulkarni

पुढीलवर्षी डिप्लोमा अभ्यासक्रम बदलणार

Patil_p

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी 1,11,111 ची देणगी

Amit Kulkarni

शहापुरात वाघनखे, हस्तिदंताच्या अंगठय़ा जप्त

Patil_p

कंग्राळी खुर्द येथे गांजा विकणाऱया युवकाला अटक

Patil_p
error: Content is protected !!