तरुण भारत

महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवासाठी नवी नियमावली जाहीर

ऑनलाईन टीम / मुंबई : 


देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. याचा परिणाम सर्वच स्तरावर होत आहे. त्यामुळे यंदा सार्वजनिक गणेशोत्सवावरही कोरोनाचे सावट आहे. कोरोनाचा वाढत फैलाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून गणेश उत्सव साजरा करण्यासाठी काही अटी आणि नियम लागू करण्यात आले आहे. हे नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. 

Advertisements


यंदा गणेश उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला जाणार आहे. गणेश मूर्तीची उंची कमी होणारच आहे. त्यासोबतच गणेश भक्तांना यंदा मंडपात जाऊन गणेशमूर्तीचे दर्शन घेता येणार नाहीच, पण हार, फुलेही अर्पण करता येणार नाहीत. तसेच गणपतीची आरती, आगमन, विसर्जन कार्यक्रमांना केवळ 10 कार्यकर्त्यांनाच आता उपस्थित राहता येणार आहे. तसा नियम करण्यात आला आहे. तसेच कोरोनाचे संकट असल्याने दिवसातून तीन वेळ गणेश मंडप निर्जंतुकीकरण करावे लागणार आहे.  


तसेच गणेशोत्सव मंडळांसाठी नियम या नियमावलीत दिले आहेत. यामध्ये मंडपात एका वेळी पाचपेक्षा जास्त कार्यकर्त्यांना उपस्थित राहता येणार नाही. त्याबरोबरच मंडपात वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मंडपाच्या लगत फुले, हार, प्रसाद यांच्या विक्रीचे स्टॉल लावता येणार नाहीत. आरतीसाठी मंडपात जास्तीत जास्त दहा कार्यकर्त्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. तसेच यंदा आगमन, विसर्जन याप्रसंगी मिरवणूक काढता येणार नाही. 


यावर्षी भक्तीपर किंवा अन्य कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करता येणार नाही. कमीत कमी निर्माल्य तयार होईल याची काळजी घेणे बंधनकारक असणार आहे. त्यासोबतच ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळून कोरोना रुग्ण, अन्य रुग्णांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे असे नव्या नियमावलीत म्हटले आहे. 

Related Stories

दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांची प्रकृती खालावली; आयसीयूमध्ये उपचार सुरू

pradnya p

लॉकडाऊनमधून उद्योगांना सवलत कितपत फायद्याची ?

Patil_p

”ज्या गोष्टीशी संबंध नाही त्यावर संजय राऊतांनी चर्चा करु नये”

triratna

गुडन्यूज : विराट – अनुष्काला कन्यारत्न!

pradnya p

कर्नाटकला कोविशील्ड लसीचे २ लाख डोस मिळालेः आरोग्यमंत्री

Shankar_P

सोलापूर : सिंहगड कोव्हिड केअर सेंटरमध्ये विपश्यनाचे वर्ग सुरू

Shankar_P
error: Content is protected !!