तरुण भारत

बोईंगकडून अपाचे, चिनूकचा भारताला पुरवठा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारताने मागणी केलेल्या सर्व लष्करी हेलिकॉप्टर्सचा पुरवठा बोईंग कंपनीकडून करण्यात आला आहे. बोईंग डिफेन्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सुरेंद्र आहुजा यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

Advertisements

‘एएच-64 ई अपाचे’ या भारताच्या 22 हेलिकॉप्टर्सच्या मागणीपैकी शेवटच्या टप्प्यातील पाच लढाऊ हेलिकॉप्टर्स भारतीय हवाई दलाला हिंडान हवाई तळावर सुपूर्त करण्यात आली. यापूर्वी मार्चमध्ये ‘सीएच-47 एफ (आय) चिनूक’ या 15 हेलिकॉप्टर्सच्या मागणीपैंकी शेवटची 5 हेलिकॉप्टर्स भारतीय लष्कराच्या हवाई तळावर सुपूर्त करण्यात आली होती. भारताने मागणी केलेल्या सर्व अपाचे आणि चिनूक हेलिकॉप्टर्सचा पुरवठा बोईंगकडून करण्यात आला आहे. 

‘अपाचे’चे सर्वात आधुनिक रूप असलेली एएच-64 ई हेलिकॉप्टर भारताला मिळाली आहेत. जगातील केवळ 17 देशांकडेच ही हेलिकॉप्टर्स उपलब्ध आहेत. भारताला लष्करी हेलिकॉप्टरचा पुरवठा करून आम्ही ही भागीदारी आणखी मजबूत केली आहे. भारतासोबतच्या भागीदारीत ग्राहकहित, आधुनिकीकरणाशी कटिबद्धता आणि भारताच्या संरक्षण दलांची सुसज्जता ही आमची प्रमुख मूल्ये आहेत, असे आहुजा यांनी म्हटले आहे.

Related Stories

उसने पैसे परत मिळत नसल्याच्या नैराश्येतून तरुणाची आत्महत्या

Abhijeet Shinde

धोनीने 2024 ची लोकसभा निवडणूक लढवावी : सुब्रमण्यम स्वामी

datta jadhav

नागालँडमधील ‘अफ्स्पा’ला सहा महिन्यांची मुदतवाढ

Amit Kulkarni

ट्रम्प यांच्या 18 रॅलींमधून 30 हजार जणांना कोरोनाची बाधा; 700 जणांचा मृत्यू

datta jadhav

शॉर्टकट घेऊ नका, आव्हाने स्वीकारा

Patil_p

दिल्लीतील कोरोना : मागील 24 तासात 1,141 नवे रुग्ण; 139 मृत्यू

Rohan_P
error: Content is protected !!