तरुण भारत

WHO कडून मुंबईतील धारावी मॉडेलचे कौतुक

ऑनलाईन टीम / जिनिव्हा : 

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी झोपडपट्टीत कोरोना नियंत्रणात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस यांनी याची दखल घेत मुंबईतील धारावी मॉडेलचे कौतुक केले आहे. 

Advertisements

जिनिव्हामध्ये एका आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस यांनी धारावीचे कौतुक केले. ते म्हणाले, धारावी हा  तब्बल 2.5 चौरस किमी पसरलेला जवळपास 6.5 लाख दाट लोकवस्ती असलेला भाग आहे. या झोपडपट्टीत कोरोनाचे रुग्ण आढळल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती.

मात्र, योग्य उपाययोजना राबविल्याने हा भाग अत्यंत गंभीर परिस्थितीतून सावरला आहे. कोरोना चाचणी करणे, रुग्णांचा शोध घेऊन त्याच्या संसर्गाची साखळी तोडणे शक्य आहे, हेच यातून दिसून येते. इटली, स्पेन आणि दक्षिण कोरियानेही कोरोनावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवले आहे. 

Related Stories

उत्तर कोरियातील तुरुंग सर्वात धोकादायक

Patil_p

कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी पक्ष न सोडण्यावर ठाम; म्हणाल्या…

Abhijeet Shinde

भारतीय शास्त्रज्ञाने शोधली कोरोनावर लस

prashant_c

तालिबानच्या भागात लष्कर-ए-तोयबाचा शिरकाव

Patil_p

सागर धनखड हत्या : सुशील कुमारच्या पोलीस कोठडीत आणखी 4 दिवसांची वाढ 

Rohan_P

युएईत विदेशी पर्यटकांना प्रवेश मिळणार

Patil_p
error: Content is protected !!