तरुण भारत

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत १९ ची वाढ

प्रतिनिधी / उस्मानाबाद

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसामध्ये कोरोनाबाधितांची संख्या 354 इतकी झाली आहे. तात्पुरत्या कारागृहातील सहा कैद्यांसह 19 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे वैद्यकीय अहवाल समोर आले आहेत.

रोजी जिल्हा सामान्य रूग्णालयामार्फत लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे तपासणीसाठी पाठविलेल्या स्वॅबचे अहवाल शनिवारी प्राप्त झाले आहेत. यातील तब्बल 19 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने जिल्ह्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे.

यामध्ये उस्मानाबाद शहरातील रामनगर येथील 2, नेहरू चौक 1, शहरानजीक शेकापूर येथील 1 आणि तात्पुरत्या कारागृहातील 6 जणांचा समावेश आहे. सदरील सहा कैदी डाएटच्या जुन्या इमारतीत तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या कारागृहात विशेष निगराणीत आहेत. भूम तालुक्यातही आणखी 5 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले असून वालवड 1 आणि राळेसांगवी येथील 4 जणांचा समावेश यामध्ये आहे. तर उमरगा तालुक्यातील 4 जणांना कोरोनाची लागण झाली असून उमरगा शहर 3, आणि मुरूम शहरातील एकाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आजवर कोरोनाबाधितांची संख्या 354 इतकी झाली असून 228 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर जिल्ह्यात आतापर्यत कोरोनामुळे 14 जणांचा बळी गेला आहे. उर्वरित रूग्ण उस्मानाबाद शासकीय रूग्णालयात 27, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय उस्मानाबाद 12, तुळजापूर उपजिल्हा रूग्णालयात 02, कळंब कोविड कक्षात 28, उमरगा उपजिल्हा रूग्णालयात 18, उमरगा येथील खासगी रूग्णालय विजय क्लिनिक येथे 08 तर शेंडगे हॉस्पिटल 02 यासह सोलापुरात 08, लातूर 05, पुणे 01, बार्शी 01 अशा एकूण 112 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

Related Stories

शिरोळमधुन एक विवाहिता वय १९ वर्षाच्या तरुणी बेपत्ता

Abhijeet Shinde

सातारकरांच्या मनात कोरोनाची धास्तीच नाही

Patil_p

सातारच्या चित्रकाराची अनोखी बुद्ध जयंती

Abhijeet Shinde

गोरेगांव भ्रष्टाचार प्रकरणी स्वातंत्र्यदिनी आत्मदहन

Abhijeet Shinde

तुंगतच्या सर्व्हेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

Abhijeet Shinde

सोलापूर : बोरामणी विमानतळाच्या जमीन संपादनासाठी ५० कोटी निधी : उपमुख्यमंत्री अजित पवार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!