तरुण भारत

कोल्हापूर : शियेतील ‘त्या’ सहा जणांचे अहवाल निगेटिव्ह

वार्ताहर/शिये

शिये ( ता.करवीर) येथील गावभागातील त्या पॉझिटिव्ह तरुणाच्या संपर्कातील सहा जणांचे कोरोना अहवाल काल, शनिवारी रात्री उशिरा निगेटिव्ह आल्याने शियेकरांना दिलासा मिळाला आहे.

९ जुलै, गुरुवारी रात्री उशिरा गावभागातील तरुणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे ग्रामस्थामध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले. पॉझिटिव्ह तरुणाच्या प्रथम संपर्कातील सहा जणांना कोरोना चाचणीसाठी शुक्रवारी सकाळी सीपीआर रुग्णालयात पाठवले. त्यामुळे ग्रामस्थांच्या चिंतेत भर पडली. शनिवारी रात्री सहा जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

तरीही ग्रामस्थांनी गाफील राहू नये. आपल्या परिवाराच्या व गावच्या सुरक्षेसाठी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन सरपंच रणजित कदम यांनी केले आहे.

Advertisements

Related Stories

ग्रामपंचायत बिनविरोधबद्दल बक्षिस म्हणून म्हारुळला निधी देणार- ना . हसन मुश्रीफ

Abhijeet Shinde

कृष्णा रूग्णालयातून तिघांना डिस्चार्ज

Patil_p

सातारा तालुक्यातील 4 बाधितांचा मृत्यू

Patil_p

शेंडा पार्क येथील हजारो झाडांना पुन्हा आगीचा धोका ? प्रशासनाचे ही दुर्लक्ष

Sumit Tambekar

वर्ध्यात कार अपघातात आमदारपुत्रासह 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू

datta jadhav

महाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशी उच्चांकी डिस्चार्ज!

Rohan_P
error: Content is protected !!