तरुण भारत

राजभवनातील 18 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

ऑनलाईन टीम / मुंबई : 

राजभवनातील 18 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. बाधितांमध्ये दोन वरिष्ठ अधिकारी आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे.

Advertisements

राज्यपालांचे कार्यालय आणि निवासस्थान असलेल्या राजभवनातील जवळपास शंभर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामधील 18 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. हे सर्व कर्मचारी राजभवन परिसरातील क्वॉर्टर्समध्ये राहतात. या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची आता कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. 

पहिल्यांदा राजभवनातील इलेक्ट्रिशियनला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर इतरांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. राज्यपालांची प्रकृती स्थीर असल्याचे सांगण्यात येते.

Related Stories

शोपियां चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा

datta jadhav

मंत्रालयाबाहेर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

Abhijeet Shinde

आसाम रायफल्सने घेतला मणिपूर हल्ल्याचा बदला

datta jadhav

टिकरी सीमेवर शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

datta jadhav

पेपरफुटी प्रकरणात राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष अटकेत

datta jadhav

जलसमाधी आंदोलन : राजू शेट्टी नृसिंहवाडीकडे मार्गस्थ

Abhijeet Shinde
error: Content is protected !!