तरुण भारत

आंतरराष्ट्रीय चित्रपटात झळकणार राधिका आपटे

आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर परंपरागत व्यक्तिरेखांना सहजतेने साकारून दर्शकांच्या मनात उतरणे, ही राधिका आपटेची ओळख आहे. एखादी व्यक्तिरेखा जिवंत करताना राधिकाला ऑनक्रीन बघणे प्रेक्षकांसाठी नेहमीच पर्वणी ठरते कारण ती आपल्या व्यक्तिरेखेसोबत नेहमीच काहीतरी नवे घेऊन येते. तिच्या अशाच एका आगामी चित्रपट ए कॉल टू स्पायचा समावेश आहे.

राधिकाचा आगामी चित्रपट ए कॉल टू स्पायची कहाणी वास्तविक जीवनावर आधारित आहे, ब्रिटिश स्पाय नूर इनायत खानच्या या आपल्या व्यक्तीरेखेसोबत जुळण्यासाठी, राधिकाने खूप मेहनत घेतली आहे. परफेक्ट लुक मिळवण्यासाठी आणि आपली व्यक्तिरेखा अधिक प्रभावी पद्धतीने साकारता यावी यासाठी तिने आपले केस देखील कापून टाकले आहेत. राधिका नेहमीच आपल्या व्यक्तिरेखा वास्तविक पद्धतीने साकारत व्यक्तिरेखेत जिवंतपणा आणते आणि प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा बनवण्यामध्ये यशस्वी ठरते. राधिकाची व्यक्तिरेखा युद्धात लढणाऱया शांतिवादी मुलीची आहे. जी रशियामध्ये एका अमेरिकन आईच्या पोटी जन्मलेली एक ब्रिटिश मुलगी आहे आणि तिचे वडिल फ्रांसमध्ये वाढलेले भारतीय मुस्लिम असून सूफीवादाशी संबंधित होते. नूर, प्रधानमंत्री विंस्टन चर्चिल यांच्या गुप्त संघटनेचा एक भाग होत्या आणि मेडेलीनच्या नावाने ओळखल्या जात होत्या. नंतर त्या पकडल्या गेल्या आणि मरण्याआधी त्यांनी जो शेवटचा शब्द म्हटला, तो लिबर्टी हा होता. दिग्दर्शक लिडियाने राधिकाला ही सर्व माहिती आणि तिची व्यक्तिरेखा यांमध्ये समन्वय शोधण्यात मदत केली आहे.

Advertisements

सामान्यपणे जेव्हा आपण युद्धाविषयी बोलतो, ऐकतो तेव्हा त्याचे नायक हे अनेकदा पुरुष असतात, मात्र अनेक महिलांनी महायुद्धात आपले प्राण पणाला लावले. राधिका देखील महायुद्धातील हे प्रकरण चित्रित करण्याबाबत अतिशय उत्सुक होती. लिबर्टीच्या सेटवर असणे आणि तो पोशाख परिधान करणे, हा तिच्यासाठी एक संपन्न अनुभव होता. असे ती म्हणते.

Related Stories

मयूर वैद्य रमलाय कथ्थकच्या रियाजात

Patil_p

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी देवेंद्र फडणवीस म्हणाले…

Rohan_P

एक वर्षापर्यंत ‘कार’मध्येच राहिली डॉक्टर

Amit Kulkarni

तुझं माझं अरेंज मॅरेजमध्ये प्रीतम कागणे

Patil_p

गोविंदा महाराष्ट्राज बेस्ट डान्सरच्या मंचावर

Patil_p

विशाखाचा अनोखा अंदाज

Patil_p
error: Content is protected !!