तरुण भारत

माझा होशील ना मालिकेच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा

अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या झी मराठीवरील माझा होशील ना या मालिकेला प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला. पण टाळेबंदीमुळे मालिकांचे चित्रीकरण देखील ठप्प झालं आणि प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या मालिकेचे नवीन भाग पाहायला मिळाले नाही. पण आता माझा होशील ना मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेतील प्रमुख कलाकार पुण्याहून पुन्हा मुंबईत आले. साधारणत: तीन महिन्यानंतर मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. प्रेक्षकांप्रमाणेच कलाकारदेखील गेल्या अनेक दिवसांपासून याची आतुरतेनं वाट पाहत होते.

याबद्दल बोलताना अभिनेत्री गौतमी देशपांडे म्हणाली, मुंबईत आल्यानंतर जवळपास 15 दिवस मी क्वारंटाईन होते. या दिवसात मी माझ्या भूमिकेच्या अभ्यासावर अधिकाधिक भर दिला. येत्या काळात मालिकेत काय बदल होतील किंवा शूटिंगसाठी स्वत:ला तयार करण्यासाठी माझी घरच्याघरी तालीम सुरु होती. कोरोनामुळे पुढचे अजून काही दिवस स्वत:ची काळजी घेणं गरजेचं आहे. नियम पाळून शूटिंग करावं लागेल. या गोष्टीला खूप घाबरून न जाता, सकारात्मकतेनं मी याला सामोरं जाऊन काम करण्याचं ठरवलं आहे. शिवाय, खूप दिवसांनंतर काम करण्याचा वेगळाच उत्साह असेल. त्यामुळे शूटिंग सुरू झाल्यानंतरही आम्ही सर्वतोपरी काळजी घेऊन पूर्वीसारखीच मजा करत आमचं काम करणार आहोत. निर्माते- दिग्दर्शक त्यांच्या परीनं सगळी खबरदारी घेतीलच. परंतु, मीही स्वत:ची योग्य ती काळजी घेईन. शिवाय, सर्व सरकारी नियमांचं मी पालन करणार आहे. असे गौतमीने सांगितले.

Advertisements

Related Stories

क्रांतिवीर राजगुरूंचे आयुष्य वेबसिरीजमध्ये

Patil_p

तेलगू ‘केबीसी’चे सूत्रसंचालन करणार ज्युनियर एनटीआर

Patil_p

‘बीस्ट’च्या चित्रिकरणासाठी पूजा हेगडे चेन्नईत

Amit Kulkarni

ओटीटीच्या विश्वातील प्रचंड महागडी सीरिज

Patil_p

व्हिडिओद्वारे कलर्सचा सकारात्मकतेचा संदेश

Omkar B

रहस्यमय गुंत्यात अडकलेल्या नौदल अधिकाऱयाची कहाणी

Patil_p
error: Content is protected !!