तरुण भारत

..अन् चक्क ऑनलाईन घटक चाचणीही झाली!

मालवणातील एका शाळेतील प्रकार

प्रतिनिधी / मालवण:

Advertisements

मालवणातील एका शाळेतील प्रशासकीय मंडळींनी थेट शाळा सुरू होण्याच्या शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा न करता, मनमानीपणे पालकांवर दबाव टाकत ऑनलाईन शिक्षण सुरू केले. पालकांना परवडत नसतानाही मुलांसाठी मोबाईल आणि लॅपटॉप अगर कॉम्प्युटर उपलब्ध करून देण्याचे निर्देश देत थेट प्रथम घटक चाचणी परीक्षाही पूर्ण केली आहे. या प्रकारामुळे प्रशालेत शिकणाऱया काही मुलांचे पालक संतप्त झाले असून जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे.

शासनाने ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही आदेश दिलेला नाही. विद्यार्थी अगर पालकांना कॉम्प्युटर, मोबाईलवर शाळा सुरू करण्याबाबत कोणतीही सूचना केलेली नाही. त्यामुळे पालकांकडून शाळा कधी सुरू होणार, याबाबत प्रतीक्षा केली जात आहे. असे असताना मालवण तालुक्यातील एका शाळेने आपल्या मर्जीतील पालकांना हाताशी धरून आपले महत्वाचे वर्ग सुरू केले आहेत. ऑनलाईन पद्धतीने मुलांना शाळेचा अभ्यास दिला जात होता. एक महिना अभ्यास झाल्यानंतर आता पहिली घटक चाचणी परीक्षाही पूर्ण करून घेण्यात आली आहे. त्यामुळे अशा पद्धतीने शाळा सुरू करण्यात आल्याने आता भविष्यात ऑनलाईन शिक्षणाची फी भरून घेतली जाण्याची भीती पालकांना आहे. यामुळे ऑनलाईन पद्धतीच्या शिक्षणाचा किती फायदा मुलांना झाला आणि परीक्षा घेऊन शाळेने काय सिद्ध केले हे प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत. तरीही ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या विरोधात असलेल्या काही पालकांनी शाळेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्याची कार्यवाही सुरू केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Related Stories

घरडा अभियांत्रिकी’ तील शासकीय कोविड सेंटर अखेर बंद

Abhijeet Shinde

मुकुंद तिळवे यांचे निधन

NIKHIL_N

अवैध एलईडी, पर्ससीन मासेमारीला चाप बसणार?

NIKHIL_N

लॉकडाऊनमुळे जिल्हय़ातील माडी व्यवसाय धोक्यात

Patil_p

रेल्वे कामगार नेत्यास कोविड बाधा झाल्याने कर्मचारी हादरले

Patil_p

रत्नागिरी : मंडणगड नगरपंचायत प्रभाग आरक्षण जाहीर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!