तरुण भारत

शिक्षणसेवक पद रद्द करा!

डीएड, बीएड संघटनेची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी : सहा हजारामध्ये उदरनिर्वाह करणे कठीण!

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

Advertisements

अन्यायकारक शिक्षणसेवक पद रद्द करण्याची मागणी रयत संकल्प डीएड, बीएड संघटनेने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे राज्यातील शिक्षणसेवकांना सहा हजार रुपये मानधन मिळत असून या मानधनामध्ये उदरनिर्वाह करणे आजच्या महागाईमध्ये कठीण आहे. मागच्या अधिवेशनात शिक्षणसेवकांचा हा प्रश्न घेण्यात आला होता. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश यांसारख्या राज्यात पहिल्या वर्षी सुमारे 17 हजार, दुसऱया वर्षी 20 हजार आणि तिसऱया वर्षी 22 हजार रुपये एवढे मानधन शिक्षकांना दिले जाते. त्यामुळे महाराष्ट्रमध्येसुद्धा ‘समान काम समान वेतन’ का लागू करावे. नियमित शिक्षकांसारख्या सगळय़ा जबाबदाऱया हे शिक्षणसेवक प्रामाणिकपणे पार पाडत आहेत, मग वेतनाच्या बाबतीत त्यांच्यावर अन्याय का? असा सवाल उपस्थित केला आहे. यामुळे अन्यायकारक असणारी शिक्षणसेवक रद्द करण्याची मागणी रयत संकल्प डीएड, बीएड संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले पाटील यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन देऊन केली.

Related Stories

सरकारचा कोकणवासीयांना दिलासा

Patil_p

मंगळवारी तब्बल 56 एसटी दाखल!

Patil_p

भाडेवाढ, अनामत रक्कम वसूल करणार

NIKHIL_N

‘बांधकाम’च्या निविदा प्रक्रियेवर मनसेचा घणाघात

NIKHIL_N

स्वीडनने स्वीकारली ‘नवी वाट’

NIKHIL_N

टेंडर 50 लाखाने वाढले, तरी कचरा तसाच!

NIKHIL_N
error: Content is protected !!