तरुण भारत

प्रदूषण रोखण्यासाठी मोठय़ा शहरांचा पुढाकार

अनेक क्षेत्रांमध्ये कारच्या वापरावर बंदी : पॅरिस शहरामध्ये 1400 किमी सायकलमार्ग निर्मितीची तयारी

वृत्तसंस्था/ पॅरिस

Advertisements

कोरोना विषाणू महामारीदरम्यान अनेक मोठय़ा शहरांमध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. अमेरिका, युरोपमध्ये काही महापौरांनी हजारो एकर जमिनीत नवी उद्याने तयार करण्याची योजना जाहीर केली आहे. सौरऊर्जेचा वापर वाढविणे, इमारतींमध्ये नैसर्गिक प्रकाशाची व्यवस्था आणि शहराच्या अंतर्गत भागांमध्ये खासगी कार्सवर बंदी घालण्यासारखी पावले उचलली जात आहेत.

कर्बवायू उत्सर्जनात घट करणे आणि प्रदूषणावर नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. पॅरिसच्या महापौर एन. हिडाल्गो यांनी शहरात 1400 किलोमीटर लांबीचा सायकलमार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

अनेक महिन्यांच्या टाळेबंदीमुळे शहरात पसरलेल्या शांततेने आरोग्य उत्तम करण्याचा संदेश दिल्याचे उद्गार हिडाल्गो यांनी काढले आहेत. कार्सच्या वापरात मोठी घट निश्चित करण्याचा मुद्दा हिडाल्गो यांनी लावून धरला आहे. जगभरातील महापौरांनी हजारो वाहनतळ बंद केले असून अनेक प्रमुख मार्गांवरील कार्सच्या वाहतुकीला मज्जाव केला आहे. पॅरिसमध्ये 2024 पासून डिझेल कार्सवर पूर्णपणे बंदी असणार आहे.

टाळेबंदीच्या काळात सुमारे 50 हजार इमारतींमध्ये व्हेंटिलेशन सुधारण्यात आले आहे. तसेच 49 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांना आता सायकलमार्गात बदलण्यात आले आहे. तसेच या सायकलमार्गाला कोरोना लेन्स नाव देण्यात आले आहे. सायकलमार्ग निर्मितीच्या विरोधात खासगी टॅक्सीसेवेच्या 2500 चालकांनी निदर्शने केली होती.

सी-40

हिडाल्गो यापूर्वी जगातील मोठय़ा शहरांची संघटना ‘सी 40’च्या प्रमुख राहिल्या आहेत. महामारीदरम्यान संघटनेची ऑनलाईन बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर अनेक महापौरांनी आमुलाग्र बदल घडवून आणणारी पावले उचलली आहेत. मिलानचे महापौर गुईसेपे साला यांनी 30 किलोमीटर लांबीचा सायकलमार्ग निर्माण करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. लंडनचे महापौर सादिक खान यांनी शहराच्या अंतर्गत भागांमध्ये येणाऱया कारवरील शुल्क वाढविले आहे.

पर्यावरण रक्षण

इस्तंबुल शहरातील वृक्षांची संख्या वाढविली जात असून क्षेत्र अधिक मोकळे ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर युरोपमध्ये पर्यावरण समर्थक राजकीय पक्षांचा प्रभाव वाढला आहे. 28 जून रोजी झालेल्या निवडणुकीत ग्रीन पार्टी-ईईएलव्हीने फ्रान्सच्या लियोन, बोर्डिअक्स यासारख्या मोठय़ा शहरांमधील महापौरपद पटकाविले आहे. ग्रीन पार्टीने युरोपीय संसदेत 10 टक्के जागा मिळविल्या आहेत. जर्मनीच्या स्थानिक निवडणुकीत या पक्षाला 20 टक्के मते प्राप्त झाली आहेत.

शहरांचा मोठा वाटा

पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळात शहरांचा हिस्सा केवळ 2 टक्के आहे. परंतु जगातील 78 टक्के ऊर्जेचा वापर शहरांमध्ये होतो. तर कर्बवायू उत्सर्जनात शहरांची हिस्सेदारी 60 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. शहरे औद्योगिक युगाचे अवशेष ठरली आहेत. शहरांना तंदुरुस्त आणि सुरक्षित करण्यासाठी नव्याने रचना करावी लागणार असल्याचे टोरंटो विद्यापीठातील शहरी जीवन तज्ञ रिचर्ड फ्लोरिडा यांनी म्हटले आहे.

Related Stories

इतिहासातील सर्वात मोठी वाईन फॅक्ट्री

Patil_p

म्यानमारच्या सैन्यावर गंभीर आरोप

Patil_p

न्यूयॉर्कमध्ये आता दिवाळीची सुटी

Patil_p

तालिबानकडून अमेरिकेलाच इशारा

Patil_p

कोरोना औषधावर संशोधन करणारे 3 संशोधक झाले रातोरात करोडपती

datta jadhav

‘आयएस’चा रॉकेटहल्ला अमेरिकेन यंत्रणेने रोखला

Patil_p
error: Content is protected !!