तरुण भारत

कोरोना लसीच्या सर्व चाचण्या यशस्वी; रशियाचा दावा

ऑनलाईन टीम / मॉस्को : 

रशियात तयार करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या सर्व चाचण्या यशस्वी ठरल्याचा दावा रशियाच्या सेकनॉफ युनिव्हर्सिटीने केला आहे.भारतातील रशियन दुतावासाने ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.

Advertisements

विद्यापीठाचे प्रमुख संशोधक इलिना स्मोलयारचुक म्हणाले, रशियात कोरोना लसीचे संशोधन पूर्ण झाले आहे.रशियात जगातील पहिली लस तयार झाली असून, ही लस पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी आहे. 18 जूनपासून रशियाच्या गमलेई इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीद्वारे तयार केलेल्या लसीच्या क्लिनिकल चाचण्या सुरू केल्या होत्या. त्या सर्व चाचण्या यशस्वी ठरल्या. त्यानंतर रविवारी सेचेनोव विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी कोरोनावर प्रभावी अशी जगातील पहिली लस तयार केल्याचा दावा केला.

संपूर्ण जगात कोरोना लसीवर संशोधन सुरू आहे. भारतातही कोव्हॅक्सिन नावाच्या लसीच्या चाचण्या सुरू आहेत. भारत बायोटेक कंपनीने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषेदच्या यांच्या संयुक्त प्रयत्नांतून ही लस तयार केली आहे.

Related Stories

पाकिस्ताननेही दिला चीनला झटका; घातली ‘बिगो’ ॲपवर बंदी

datta jadhav

प्रजासत्ताकदिनी मोदींचा रस्ता पुन्हा अडवणार

datta jadhav

आंतरराष्ट्रीय कॉलमधील तिसरा संशयित युक्रेनमध्ये ?

Abhijeet Shinde

मेक्सिकोत कोरोनाबळींची संख्या 91 हजारांवर

datta jadhav

135 देशात ‘डेल्टा’चे थैमान

datta jadhav

गॅस सिलिंडर महागला

datta jadhav
error: Content is protected !!