तरुण भारत

कोल्हापूर : कबनुरातील नामवंत डॉक्टर पॉझिटिव्ह ; २५० जण संपर्कात

प्रतिनिधी / कबनूर

येथील मुख्य चौका लगत असलेल्या एका दवाखान्यातील नामवंत डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या दवाखान्यातील आणखीन एक डॉक्टर व अन्य 9 कर्मचारी अशा दहा जणांना ताबडतोब अतिग्रे येथील घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये स्व ब तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे .गावात आतापर्यंत दोन रुग्ण आढळून आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच प्रशासन यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

Advertisements

कबनुर ता. हातकणंगले येथील मुख्य चौकातील नामवंत डॉक्टर वय वर्षे ३५ यांचा स्वॅब घेण्यासाठी कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये रविवारी दाखल करण्यात आले होते. दाखल डॉक्टरांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळताच डॉक्टरांच्या दवाखान्यातील त्यांचे एक सहकारी डॉक्टरांसह १० जणांना स्वॅब तपासणीसाठी अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या गावातील सुमारे अडीचशे जणांचे लवकरच स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात येत आहे.

दवाखाना परिसर व डॉक्टरांचे निवासस्थान परिसर पूर्णपणे सील करण्यात आला असून त्या परिसरामध्ये ग्रामपंचायतीच्यावतीने औषध फवारणी करून दोन्ही भाग निर्जंतुकीकरण करण्यात आलेला आहे. यापूर्वी येथील तिरंगा कॉलनी गल्ली नंबर १ मध्ये असलेला एक व्यक्ती मिरज येथील मिशन हॉस्पिटलमध्ये डायग्नोसिस साठी गेला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ग्रामपंचायतकडून संपूर्ण भाग सील करण्यात आलेला होता. दरम्यान, रविवारी रात्री येथील नामवंत डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाल्यामुळे गावामध्ये आतापर्यंत बाधित संख्या दोन झाली आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने गावांमध्ये रिक्षा फिरवून नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घ्यावी तोंडाला मास्क लावावे कारण नसताना फिरवू नये असे आव्हान सरपंच सुनील स्वामी व ग्रामविकास अधिकारी बी. टी. कुंभार यांनी केले आहे.

Related Stories

प्रभाग रचना करताना घाम फुटणार

Abhijeet Shinde

सरसकट कर्जमाफी होत नाही तोपर्यंत सेवा संस्थांना टाळेच

Abhijeet Shinde

शरद पवारांसह केंद्रातील सर्वच नेत्यांनी मराठा आरक्षणावर लक्ष घालणे गरजेचे

Abhijeet Shinde

पहाटेच्या सुमारास ठाणे पश्चिम येथे कोसळला इमारतीचा भाग

Rohan_P

मुख्यमंत्र्यांनाच दिले चाबकाचे फटके!

Abhijeet Shinde

राजर्षी शाहू महाराज अन् सर विश्वेश्वरय्या !

Abhijeet Shinde
error: Content is protected !!