तरुण भारत

‘सारी’ बळींना बिम्सकडून झुकते माप?

मृतदेहांचे परस्पर हस्तांतरण, समाजस्वास्थ्यासाठी धोक्मयाचा इशारा

बेळगाव

Advertisements

कोरोना महामारीमुळे बेळगाव जिल्हय़ातील वैद्यकीय यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. जिल्हय़ातील बहुतेक रुग्णांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. गेल्या आठवडाभरात मृत्यूचे प्रमाण झपाटय़ाने वाढले आहे. त्यामुळे बिम्स प्रशासन मोजदाद करण्यात गोंधळत आहे का? असा संशय बळावला आहे. कारण 10 ते 12 मृत्यूचा हिशेब अद्याप मिळाला नाही.

खासकरून ‘सारी’ रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण झपाटय़ाने वाढते आहे. रोज किमान 2 ते 5 जणांचा बळी जात आहे. त्यामुळे बिम्स प्रशासनाला हे मृतदेह ठेवण्यास जागा अपुरी पडत आहे. सोमवारी सायंकाळी उपलब्ध झालेल्या आकडेवारीवरून आतापर्यंत कोरोनामुळे जिल्हय़ात 15 जणांचा बळी गेला आहे. यामध्ये बेळगाव व अथणी तालुक्मयातील मृतांची संख्या अधिक आहे.

बिम्समधील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱयांचा कोरोना विरोधी लढय़ातील योगदान मोठे आहे. अनेक मातब्बर इस्पितळात कोरोना रुग्णांना प्रवेशबंदी असताना बाधितांवर उपचार करून शाबासकी मिळविणाऱया बिम्स प्रशासनाच्या गलथानपणामुळे कोरोनाचा फैलाव वाढण्याचा धोका अधिक आहे. कारण शवागारात मृतदेह ठेवण्यास जागा अपुरी पडत असल्यामुळे काही मृतदेह परस्पर हस्तांतरित करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

‘सारी’ रुग्णांवर सर्जिकल व ऑर्थोपेडिक विभागात उपचार करण्यात येत आहेत. या वॉर्डमध्ये संशयितांना ठेवण्यात येते. मृत्यूनंतर त्यांची स्वॅब तपासणी केली जाते. अहवाल येईपर्यंत संबंधिताचा मृतदेह शवागारात ठेवण्यात येतो. जर स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आला तर मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात येतो. अन्यथा कोविड-19 नियमानुसार या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येतात.

गेल्या दोन दिवसांत मृत्युमुखी पडलेल्या आठहून अधिक संशयितांचे मृतदेह बिम्समध्ये ठेवण्यात आले आहेत. प्रयोगशाळा बंद असल्यामुळे सोमवारी रात्रीपर्यंत त्यांचा अहवाल आला नाही. मात्र, सोमवारी मृत्युमुखी पडलेल्या काही जणांचे मृतदेह स्वॅब तपासणी अहवाल येण्याआधीच कुटुंबीयांना हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

शवागारात मृतदेह ठेवण्यास जागा अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे अहवाल येण्याआधीच मृतदेह सोपविण्याचा धोकादायक खेळ बिम्स प्रशासनाने सुरू केला आहे. सोमवारी निडसोशी, ता. हुक्केरी येथील 56 वषीय रहिवाशाचा मृत्यू झाला. मूत्रपिंडाच्या आजाराने तो त्रस्त होता. त्याचे स्वॅब घेऊन मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

10 जुलै रोजी शिवबसवनगर येथील एका 80 वषीय वृद्धेला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला हलविताना वाटेतच तिचा मृत्यू झाला होता. या वृद्धेच्या कुटुंबीयांनीही आमच्या आजीचा अहवाल पॉझिटिव्ह येण्याची शक्मयता नाही, असे सांगत त्यांनी मृतदेहाची मागणी केली. मात्र, डॉक्टरांनी या वृद्धेचे स्वॅब घेऊन मृतदेह शवागारात पाठविला. दोन दिवसांनंतर तिचा अहवाल नेमका पॉझिटिव्ह आला. असे अनेक प्रकार सिव्हिलमध्ये घडू लागले आहेत.

गेल्या दोन-तीन दिवसांत मृत्युमुखी पडलेल्या संशयितांच्या मृतदेहांनी शवागार भरले आहे. अहवाल कधी येणार? मृतदेह कधी आमच्या ताब्यात देणार? पॉझिटिव्ह येणार की निगेटिव्ह? या चिंतेने मृतांचे कुटुंबीय सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारातच ठाण मांडून आहेत. प्रयोगशाळा बंद असल्यामुळे अहवाल अडकले आहेत. त्यामुळे स्वॅब घेऊन कोविड-19 नियमानुसार ते मृतदेह व्यवस्थित सीलबंद करून पाठविण्यात येत असले तरी जर एक-दोन दिवसांत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर त्यांच्या संपर्कातील लोकांचे काय होणार, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. हा जीवघेणा खेळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुरू झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.

Related Stories

युवकाच्या उपचाराला मदतीचे आवाहन

Patil_p

घर कोसळलेल्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या

Patil_p

बेळगाव -बेंगळूर दरम्यान धावणार विशेष रेल्वे

Rohan_P

इनरव्हील क्लबकडून शाळेला वहय़ांचे वाटप

Patil_p

पोवडय़ातून जागविला संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास

Patil_p

शाळाबाहय़ मुलांच्या गणतीमध्ये वाढ होण्याची शक्यता

Patil_p
error: Content is protected !!