तरुण भारत

पाण्डव निवाले संपूर्ण

इंद्रप्रस्थ नगरीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या गोपुराच्या सज्जात पाचही पांडव उभे होते. दूरवर नजर टाकली त्यावेळी त्यांना गरुडध्वज लावलेला रथ येताना दिसला. सर्वेश्वर भगवान श्रीकृष्ण आलेले पाहून सर्व वीर पांडव एकदम उठून उभे राहिले. चंद्राचा उदय होताच समुद्राला जशी भरती येते तसे कृष्णाला पाहताच पांडव धावत त्याला सामोरे गेले.

रथीं असता जनार्दन । सर्वीं करूनि अभिवंदन ।

सप्रेम प्रीती हास्यवदन । अवलोकून निवाले ।

युधि÷िराचिया आगमनीं । रथावरूनि चक्रपाणि ।

भेटता जाला उतरूनि धरणी । पाहूनि नयनीं संतुष्ट ।

अच्युतातें आलिंगून । पाण्डव निवाले संपूर्ण ।

जालें पापांचें क्षालन । असंगांगसंस्पर्शें ।

युधि÷िरासह भीमाचे । कृष्णें चरण वंदिले साचे ।

समनवयस्का अर्जुनाचें । हृदय हृदयीं आळंगिलें ।

माद्रीतनय चरणांवरी । मस्तक ठेवूनि नमिती हरि।

कृष्णें स्पर्शोनि शंतमकरिं । अतिसत्वरी ऊठविले ।

कृष्णदर्शनें मोदावाप्ति। संस्पर्शनें अघनिवृत्ति ।

मग भेटले सप्रेम भक्ती । युयुधानादि अनुगांतें ।

बैसूनियां एके रथीं । नगरिं चालतां राजपथीं ।

पुढें नगरजनांच्या पंक्ति । हरि अर्चिती सप्रेमें ।

कुर्वंडूनि सांडिती बळी । साष्टांग नमिती भूमंडळीं ।

गीतनृत्यांची धुमाळी । वाहूनि टाळी हरि स्मरती ।

बहुविध वाद्यें दोहींकडे । सप्रेम दर्शनाचिये चाडे ।

लोक दाटतां पुढें पुढें । वेत्रपाणि निवारिती ।

रथांत बसलेल्या कृष्णाचे हास्यवदन पाहून पांडव आनंदले व त्यांनी हात जोडून त्याला वंदन केले. युधि÷िर पुढे आलेला पाहून कृष्णाला आनंद झाला व तो रथावरून खाली उतरला. अच्युताला पांडवांनी प्रेमाने आलिंगन दिले. त्याच्या स्पर्शानेच सर्व पातके नष्ट झाली. वयाने ज्ये÷ असलेल्या युधि÷िर व भीमसेनाला कृष्णाने वंदन केले. समवयस्क अर्जुनाला आलिंगन दिले. या हृदयाला ते हृदय मिळाले. नकुलाने व सहदेवाने भगवंताच्या चरणांना आलिंगन दिले. कृष्णाने त्यांना प्रेमाने उठविले. कृष्ण दर्शनाने सर्वांना आनंद प्राप्त झाला व त्याच्या स्पर्शाने पापनाश. मग कृष्ण युयुधानादी इतरांना प्रेमाने भेटले. मग एका रथात देवाला बसवून रथ राजपथाने निघाला. देवाच्या दर्शनासाठी लोक गर्दी करू लागले. रस्त्यातच लोटांगण घालू लागले. गीत गाऊ लागले. नाचू लागले. वाद्ये वाजवू लागले. टाळय़ा वाजवून भजन करू लागले. दोन्ही बाजूनी वाद्यांचे गजर होत होते. सेवक रस्त्यातील गर्दी दूर करून रथाला वाट करून देत होते. थोडय़ा वेळाने कृष्ण व पांडव इंद्रप्रस्थाच्या राजवाडय़ात पोहोचले.

परमषे÷ दिव्यासन ।तेथें बैसविला भगवान ।  येर यादव सह युयुधान । सभास्थानीं बैसविले। लावूनि अंतर्धानपट । पांचही बंधु कृष्णानिकट। याज्ञसेनी अंतर्नि÷ । येती जाली हरिनमना । कृष्णा म्हणिजे याज्ञसेनी। अनिंदिता या विशेषणीं।  विशेषिली काय म्हणोनी । तें सज्जनीं परिसावें । पांचा बंधूंसि भार्या एकी । निर्दोष सुस्नात अग्निमुखीं। यास्तव निंदेच्या कलंकीं । कोण्ही न नोकी जगत्रयीं ।

देवदत्त परुळेकर

Related Stories

भीतीला सामोरे जाताना…

Patil_p

दंड धरी जेंवि कृतान्त

Omkar B

तेथ न दिसे पुरुष तैसा

Patil_p

कविता हाच कवी जिवंत असल्याचा पुरावा

Patil_p

प्राणिक हीलिंगः एक आधुनिक आणि पूरक उपचार पद्धती

Patil_p

स्वभावो दुरतिक्रमः।……….(सुवचने)

Patil_p
error: Content is protected !!