तरुण भारत

वळीवडेत कोरोना रुग्णांची संख्या तेरा

उचगांव / वार्ताहर

वळीवडे (ता. करवीर) येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत आणखी दोघांची भर पडली असून आजअखेर ती 13 झाली आहे. दरम्यान, गांधीनगरमधील एका व्यापाराचा सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्याने रुग्णसंख्या तीन झाली आहे.
वळीवडे येथील साई वसन शाह कॉलनीमधील पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यापाऱ्याच्या पत्नी आणि मुलगीचा अहवालही पॉझिटिव यापूर्वीच आला आहे. रविवारी एक महिला, दोन बालक व त्यांचे आई-वडील अशा पाच जणांचा अहवाल पॉझिटिव आला. सोमवारी या बालकांच्या आजोबांसह एका महिले चा अहवाल पॉझिटिव आला.

त्यामुळे वळीवडे येथील रुग्णसंख्या 13 वर पोहोचली आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या वतीने शांतीप्रकाश कॉलनीसह वळीवडे येथे ग्रामस्वच्छता व औषध फवारणीवर भर देण्यात आला आहे. सरपंच अनिल पंढरे, विक्रम मोहिते, भगवान पळसे, ग्रामविकास अधिकारी बी डी पाटील ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांसह औषध फवारणी व जनजागृती करत आहेत. हा परिसर पूर्णपणे सील केला आहे.

Advertisements

Related Stories

इचलकरंजीतील कुख्यात बाबर गँगविरोधी मोकाअंतर्गत कारवाई

Sumit Tambekar

जेईई मेन परीक्षेत गणित विषयात जयेश बागुल भारतात प्रथम

Patil_p

धक्कादायक : कळंबा कारागृहातील ३७ कैद्यांना कोरोनाची लागण

Abhijeet Shinde

वैज्ञानिक होण्यासाठी जिद्द आणि आत्मविश्वासाची गरज : पोळ

Abhijeet Shinde

कोल्हापूर : ट्रॉमा केअर’ 5 महिन्यांनंतर सोमवारी सुरू

Abhijeet Shinde

Monsoon Update : मान्सून अंदमानात दाखल

Abhijeet Shinde
error: Content is protected !!