तरुण भारत

माशेल भागात मर्यादीत लॉकडाऊन यशस्वी

हळदणवाडा हॉटस्पॉट, दुकाने सकाळच्या सत्रात खुली

वार्ताहर / माशेल

Advertisements

माशेल परीसराला जवळच्या बेतकी खांडोळा पंचायत क्षेत्रातील हळदणवाडा कोरानाचा  हॉटस्पॉट ठरलेला आहे. सदर विभाग मायक्रो कंटेनमेंट झोन जाहीर केल्यानंतर काल सोमवारपासून माशेल येथील मुख्य बाजारपेठेसह संपूर्ण तिवरे वरगांव पंचायत क्षेत्रातील दुकाने, कार्यालये फक्त सकाळच्या सत्रात 7 वा.पासून  ते दुपारी 11 वाजेपर्यत खुली केल्यानंतर बाकी पुर्णवेळ स्वेच्छेने बंद ठेऊन मर्यादीत लॉकडाऊन पाळण्यात आला. माशेल परीसरात सद्यपरिस्थितीत 47 जण कोरोनाबधित असून एकूण 11 जण बरे झाले असल्याची माहिती डॉ. ब्रॅन्डा पिंटो यांनी दिली आहे. 

कोरोनाच्या सावटात खबरदारीच्या उपाययोजना म्हणून सात दिवस माशेल बाजारसह संपूर्ण पंचायत क्षेत्रात मर्यादित लॉकडाऊनचे आवाहन येथील पंचसदस्यांनी केले आहे. व्यापाऱयांनी आपली दुकाने स्वच्छेने बंद ठेऊन व नागरिकांनी घरीच थांबून या लॉकडाऊनला प्रतिसाद दिला. रविवार 19 जुलै पर्यंत सकाळच्या सत्रात दुकाने उघडीत बाकी पुर्ण वेळ बंद पाळण्यात येणार आहे. या भागात केवळ अत्यावश्यक सेवा सोडल्यास बहुतेक सर्व व्यवहार बंद होते. माशेल बाजारात दुपारनंतर शुकशुकाट पसरला होता. या मार्गावरील खासगी प्रवासी बस वाहतूकही सध्या बंद ठेवण्यात आली आहे. माशेल परीसराला लागून असलेल्या साखंळी, कुभांरजुवे, सांतिइस्तेव्ह या भागातील लोकांसाठी माशेल ही मुख्य बाजारपेठ आहे. या लोकांची बाजारहटीसाठी तसेच नोकरी व्यवसायानिमित्त ये-जा असते. गर्दीचा माहोलावर नियंत्रण म्हणून   खबरादारीची उपाययोजना बाळगताना स्वेच्छा लॉकडाऊन करण्यात आले आहे. बेतकी खांडोळाचे उपसरपंच जयेश नाईक यांनी सात दिवशीय मर्यादीत लॉकडाऊनला नागरिक व दुकानदारांचे सहकार्य मिळत असल्याने आभार व्यक्त केले आहेत. कोरोनाचा प्रभाव कमी होईपर्यंत नागरिकांनी विनाकारण बाजारहटीसाठी फिरकू नये. गरज असल्यास बाहेर पडावे, सामाजिक अंतर पाळणे, मास्क वापरून काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. तिवरे गावातील लोकांनी स्वतःहून खबरादारीची उपाययोजना म्हणून नियमितपणे सात दिवस मर्यादीत लॉकडाऊन पाळण्यात येणार असल्याचे समाजसेवक शेखर गावकर यांनी सांगितले. या महामारीवर स्वच्छेने लॉकडाऊन हा एकमेव उपाय असल्याचे मत व्यापारी अरूण परब यांनी सांगितले. पंचसदस्यांनी केलेल्या आवाहनानुसार आपण स्वतः दुकान बंद ठेवून याला सहकार्य करीत असल्याचे ते म्हणाले.

Related Stories

बेतोडा भागात पाणी समस्या तीव्र

Omkar B

वेर्णात दरीत कोसळलेल्या कारने घेतला पेट

Amit Kulkarni

मडगावातील दुहेरी खून प्रकरण सत्र न्याया.त वर्ग करण्याचा आदेश

Patil_p

हडफडेत पाच लाखांचा गांजा जप्त

Amit Kulkarni

कर्नाटकातील कोरोना उद्रेकाचा परिणाम मुरगाव बंदरावर

Patil_p

सत्तरी तालुका शेतकरी सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली.

Amit Kulkarni
error: Content is protected !!