तरुण भारत

रत्नागिरी : ‘घरडा’ कंपनी व्यवस्थापन हादरले; आज २१ कोरोनाबाधितांची भर


प्रतिनिधी / खेड

तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील घरडा कंपनीसह वसाहतीतील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने कंपनी व्यवस्थापन पुरते हादरले आहे. मंगळवारी प्राप्त अहवालानंतर २१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड होताच एकच खळबळ उडाली आहे. कंपनी व्यवस्थापनाने घरडा हॉस्पिटलमधील खासगी कोविड सेंटरमध्ये १८० जणांची कोविड चाचणी केली. यामध्ये २१ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्याने व्यवस्थापनाची चिंता वाढली आहे.

Advertisements

घरडा वसाहतीतील १५, चिपळूणमधील ४ लवेलमधील २ रूग्णांचा समावेश आहे. घरडा कंपनीत आलेल्या कोरोनाबाधितांमुळे चिपळूण व खेड तालुक्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत चालले असून घरडा वसाहतही कोरोनाच्या विळख्यात अडकली आहे. घरडा कंपनीशी संबंधित कोरोनाबाधितांची संख्या ६३ वर पोहचलेली असतानाच त्यात आता नव्या २१ रुग्णांचीही भर पडली आहे.

Related Stories

रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याखाली सापडला युवतीचा मृतदेह

Patil_p

सावंतवाडीतील हुकुमशाही कारिवडेत चालणार नाही!

NIKHIL_N

मतलई वाऱयांमुळे मासेमारी थंडावली

Patil_p

संगमेश्वरात 10 वर्षीय बालिकेचा कोरोनाने मृत्यू

Patil_p

जिल्हय़ातील युवकांना गोव्यात नोकरीस सामावून घ्यावे

NIKHIL_N

सहकारविरोधात पॅनल उभे करणार!

Patil_p
error: Content is protected !!