तरुण भारत

पंचायत समितीच्या आरोग्य विभागाचे कार्यालय हलवा

पंचायत समितीत सोशल डिस्टन्सचा अभाव
●पदाधिकाऱ्यांकडे निर्णयाचा अभाव
●कोणीही येतंय कोणीही जातंय
●कोरोनाचा धोका होण्याचा शक्यता
●बेशिस्तिचे प्रचंड दर्शन

सातारा/प्रतिनिधी

Advertisements

कराड पंचायत समितीच्या कक्ष अधिकारी यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा होताच सातारा जिल्हा परिषदेत कडक नियमावली केली आहे. मात्र, सातारा पंचायत समितीत कोणी ही या आपलंच हाय अशी अवस्था झाली आहे. आरोग्य विभागाचे असलेले कार्यलय तूर्तास पंचायत समितीच्या सभागृहात करावे जेणेकरून सर्व्हे करून आलेल्या कर्मचाऱ्यांना सोशल डिस्टनन्स ठेवून काम करता येईल, अशी मागणी होत आहे. परंतु पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे निर्णय क्षमता घेण्याचे धाडस नाही.

कोरोनाच्या संकटात सातारा पंचायत समितीमध्ये जी काळजी घ्यायला पाहिजे ती घेतली जात नाही. नुसते सानिटायझर मशीन बसवून उपयोग नाही.सातारा पंचायत समितीच्या आवारात कोणी ही येते आणि कोणीही जाते. दाटीवाटीने वेगवेगळे विभाग एकाच खोलीत काम करतात. तर आरोग्य विभाग एका खोलीत काम करतो. सोशल डिस्टनन्स पाळला जात नाही.सध्या तालुक्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे.तेथे प्रत्यक्ष सर्व्हेला असणारे कर्मचारी सर्व्हे करून माहिती देण्यासाठी पंचायत समितीच्या आरोग्य विभागात त्या कक्षात येतात तेव्हा अगोदर अरुंद खोली, त्यात सोशल अंतर कसे पाळले जाणार?, यासाठी आरोग्य विभागाचे कार्यलय तात्पुरते पंचायत सभागृहात हलवण्यात यावे अशी मागणी होत आहे. परंतु पदाधिकारी यांच्याकडे निर्णय क्षमता नसल्याने कराड पंचायत समितीची जशी अवस्था झाली तशी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Related Stories

वीजदर कपातीची घोषणा फसवी : ६.७ टक्के दरवाढ होणार

Abhijeet Shinde

सातारा जिल्ह्यात आज 5 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

कलम ३७० हटवल्यानंत्तर अमित शाह पहिल्यांदाच जम्मू काश्मीर दौऱ्यावर

Abhijeet Shinde

जम्बो हॉस्पिटल कि पर्यंटन सेंटर

Patil_p

माणगंगा दुथडी, पिकांचे नुकसान

Patil_p

महाराष्ट्रात 4,589 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P
error: Content is protected !!