तरुण भारत

कोल्हापूर जिल्हय़ात कोरोनाचे सहा बळी

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्हय़ात गेल्या 24 तासांत कोरोनाने 6 जणांचा बळी घेतला, त्यामुळे कोरोना बळींची संख्या 32 वर पोहोचली आहे. मृतांमध्ये कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्क, हुपरी, नेज शिवपुरी, जैनापूर, इचलकरंजी, तारदाळ येथील व्यक्तींचा समावेश आहे. दरम्यान, दुपारपर्यत 16 जण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये एका महिला डॉक्टराचा समावेश आहे. इचलकरंजी येथील 11 आणि शहरातील 6 जणांचा समावेश आहे.

Advertisements

जिल्हय़ात सोमवारी रात्री उशिरा कोरोनाने सहा जणांचा बळी गेला. यामध्ये हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील 60 वर्षीय महिला, ताराबाई पार्क येथील 83 वर्षीय वृद्ध, हातकणंगले तालुक्यातील नेज शिवपुरी येथील 65 वर्षीय महिला, इचलकरंजी येथील हौसिंग सोसायटीतील 65 वर्षीय महिल। शिरोळ तालुक्यातील जैनापूर येथील 46 वर्षीय पुरूष आणि तारदाळ येथील 83 वर्षीय वृद्धाचा समावेश आहे.

जिल्हय़ात मंगळवारी दुपारी आलेल्या 17 पॉझिटिव्ह रूग्णांत शहरातील रमणमळा येथील 23 वर्षीय तरूणी, टेंबलाईवाडी येथील 42 वर्षीय महिला, 85 वर्षीय वृद्धा, राजारामपुरीतील 25 वर्षीय महिला, कदमवाडी येथील हॉस्पिटलमधील जमशेदपूर (झारखंड) येथील 27 वर्षीय महिला डॉक्टर, गांधीनगर येथील 35 वर्षीय महिला, हातकणंगले येथील 65 वर्षीय वृद्धा, इचलकरंजी येथील 52 वर्षीय पुरूष, 76 वर्षीय वृद्धा, 40 वर्षीय पुरूष, 35 वर्षीय महिला, गणेशनगर 4 चौथी गल्ली येथील 9 वर्षांची बालिका, 36 वर्षीय महिला, 70 वर्षीय पुरूष, 14 वर्षांचा मुलगा, 42 वर्षांचा पुरूष, 15 वर्षांची मुलगी यांचा समावेश आहे.

Related Stories

कराड देशात अव्वल तर सातारा कुठे?

Patil_p

कोल्हापूरात बैलगाडी मोर्चा काढत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन

triratna

महाराष्ट्रात 4,132 नवे कोरोना रुग्ण; 127 मृत्यू

pradnya p

सांगली : कोरोनाचा कहर ; एकाच दिवसात ४० रूग्ण

triratna

पन्हाळ्यातील ऐतिहासिक वास्तू खुल्या करा

triratna

‘सफरअली आजच्या काळाच्या भयानकतेची जाणीव करून देणारे कवी’

triratna
error: Content is protected !!