तरुण भारत

मुकेश अंबानी जगातील श्रीमंतात 6 व्या स्थानी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

रिलायन्स इंडस्ट्रिजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे जागतिक स्तरावरील श्रीमंतांच्या यादीत सहाव्या स्थानावर राहिले आहेत. ब्लूमबर्गच्या बिलियनर्स इंडेक्सनुसार जाहीर केलेल्या यादीत अंबानी यांनी ही कामगिरी केली आहे. श्रीमंत व्यक्तिंच्या यादीत अग्रस्थान 184 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ऍमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस यांनी पटकावले आहे.

Advertisements

भारत आणि आशियात आधीपासूनच सर्वाधिक श्रीमंतांची मांदियाळी आहे. मुकेश अंबानी यांनी वरील यादीत सहावे स्थान प्राप्त केले असून त्यांनी गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज, वॉरेन बफे यांना मागे टाकले आहे. गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज यांची संपत्ती 71.6 अब्ज डॉलर्सवर पोहचली आहे. ब्लूमबर्गनुसार मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती आता 72.4 अब्ज डॉलर्सची झाली आहे. सोमवारी अंबानींनी सहावे स्थान प्राप्त केल्याचे जाहीर झाले आणि त्याचदिवशी रिलायन्सच्या समभागांमध्ये 3  टक्के उसळी दिसली. 

अमेरिकेतील शेअर बाजारातील पडझडीचा फायदा मुकेश अंबानी यांना मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणूनच रिलायन्सच्या समभागांनी शेअर बाजारात सोमवारी तेजी अनुभवली होती.

13 कंपन्यांची गुंतवणूक

यावर्षी सुरूवातीच्या महिन्यांमध्ये व्यवसायातील कमकुवत सुरूवातीनंतर मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजने नंतर विकासाची गती पकडली. रिलायन्सच्या जिओ प्लॅटफॉर्ममध्ये एका पाठोपाठ 13 गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले. या गुंतवणूकदारांनी अंबानी यांना 1 लाख 18 हजार कोटी रुपये मिळवून दिले आहेत. ही गुंतवणूकच रिलायन्सच्या शेअर्सच्या भावात सुधारणा होण्यामागे कारणीभूत ठरली आहे.

जगातील श्रीमंत

 व्यक्ति             संपत्ती

1. जेफ बेजोस . 184 अब्ज डॉलर्स

2. बिल गेटस् .. 115 अब्ज डॉलर्स

3. बर्नार्ड अरनॉल्ट            94.5 अब्ज डॉलर्स

4. मार्क झुकरबर्ग             90.8 अब्ज डॉलर्स

5. स्टेली बालमर 74.6 अब्ज डॉलर्स

6. मुकेश अंबानी 72.4 अब्ज डॉलर्स

Related Stories

इपीएफओकडे जुलैमध्ये 8.45 लाख नवीन नावनोंदणी

Patil_p

भारत ई मार्केटचा लोगो लवकरच

Patil_p

कोळसा उत्पादनाचे ध्येय कायम ठेवा

Patil_p

कार्लाइल समुहाची रिलायन्समध्ये गुंतवणूक

Patil_p

रस्ते अपघात कमी करण्याचे ध्येय

Patil_p

ऍमेझॉनकडून एक लाख जणांना रोजगार

Patil_p
error: Content is protected !!