तरुण भारत

3-रो एमजी हेक्टर प्लस भारतीय बाजारात

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय बाजारात 3-रो एमजी हेक्टर प्लस ही नवी कोरी कार सादर करण्यात आली आहे. सदर कारची सुरुवातीची किमत 13.14 लाख रुपये आहे. यातच कंपनीने शार्प डिझेल ट्रीम, पेट्रोल हायब्रिड अशांसह विविध मॉडेल्स बाजारात आणल्या असून त्यांच्या किमती 18.54 लाखापर्यंत असणार आहेत. कंपनीने मागील आठवडय़ात मोठय़ा प्रमाणात बुकिंग सुरु केले होते. याच्यासाठी 50 हजार रुपयांची रक्कम ग्राहकांना जमा करावी लागणार आहे. हेक्टर प्लस एकूण आठ व्हर्जनमध्ये उपलब्ध असून यामध्ये चार ट्रिम्स आणि चार इंजिन गिअरबॉक्स कॉम्बीनेशनचा समावेश आहे.

Advertisements

फिचर

हेक्टर प्लसला मल्टी फंक्शन स्टीयरिंग व्हील, 7.0 इंच एमआयडीसोबत ऍनालॉग इंस्टूमेंट क्लस्टर, ऍपल कारप्ले, अँड्राईड ऑटोसोबत 10.4 इंचाचा टचस्क्रीन आणि कनेक्टेड व्हेइकल टेक, एक इन्फिनिटी ऑडिओ सिस्टमसह अन्य सुविधा प्रदान करण्यात येणार आहेत.

Related Stories

बजाज ऑटोने ‘डॉमीनर’च्या किंमती घटवल्या

Patil_p

ऍम्पीयरची येणार मायलेजवाली इलेक्ट्रीक स्कुटर

Patil_p

कियाने 1 लाख विक्रीचा टप्पा केला पार

Patil_p

ई-स्कूटर निर्मितीचा ओलाचा नवा प्लान

Omkar B

स्मार्टफोन कंपनी शाओमी कार निर्मितीत उतरणार

Patil_p

फोक्सवॅगनने वाढवल्या किंमती

Amit Kulkarni
error: Content is protected !!