तरुण भारत

नेपाळचे पंतप्रधान ओली बरळले

भगवान राम तसेच अयोध्येसंबंधी वादग्रस्त विधान : नेपाळमधूनही टीकेची झोड : सत्ता गमाविण्याची भीती

वृत्तसंस्था/ काठमांडू

Advertisements

नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी भगवान रामाच्या जन्मस्थळासंबंधी अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे. या प्रकरणी ओली यांच्यावर भारतासह नेपाळमधूनही टीकेची झोड उठविण्यात आली आहे. नेपाळच्या अनेक नेत्यांनी ओली यांच्या या विधानाला उघडपणे विरोध दर्शविला आहे. भारत आणि नेपाळ यांच्यात तणावाची स्थिती असताना ओली यांनी बेताल विधाने टाळावीत अशा शब्दांत त्यांना सुनावण्यात आले आहे.

सत्ता गमवावी लागणार असल्याचे पाहून ओली सातत्याने भारताला लक्ष्य करत आहेत. भारताने सांस्कृतिक अतिक्रमणासाठी बनावट अयोध्येची निर्मिती केली आहे, प्रत्यक्षात खरी अयोध्या नेपाळमध्येच असल्याचे बेताल विधान ओली यांनी सोमवारी केले आहे. पुराणकाळात वाहतुकीची आधुनिक साधने आणि मोबाईल फोन नसताना राम जनकपुरापर्यंत कसे पोहोचले, असे अत्यंत वादग्रस्त विधान ओली यांनी केले आहे. भारत मला सत्तेवरून हटविण्याचा कट रचत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

पंतप्रधान ओली यांनी अशाप्रकारची निराधार आणि खोटी विधाने करू नये. तणाव दूर करण्याऐवजी ओली हे नेपाळ-भारत संबंध बिघडवू पाहत असल्याची टीका नेपाळमधील राष्ट्रीय प्रजातांत्री पक्षाचे सह-अध्यक्ष कमल थापा यांनी केली आहे.

सांस्कृतिक अत्याचाराचा दावा

नेपाळी कवी भानुभक्त आचार्य यांच्या 206 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी ब्ल्यूवॉटर येथे आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित करताना ओली यांनी वादग्रस्त आणि तथ्यहीन वक्तव्ये केली आहेत. नेपाळवर सांस्कृतिक स्वरुपात अत्याचार करण्यात आले आहेत. ऐतिहासिक सत्याचा विपर्यास करण्यात आल्याचे ओली बरळले आहेत.

राजीनाम्याची मागणी

नेपाळमध्ये मागील काही दिवसांपासून ओली यांच्या राजीनाम्याची मागणी जोर पकडू लागली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन स्थगित केल्यावर केपी ओली अध्यादेशाद्वारे नेपाळ कम्युनिस्ट पक्षात फूट पाडण्याचा कट रचत आहेत. तसेच पाठिंब्यासाठी ओली मुख्य विरोधी पक्ष नेपाळी काँग्रेसशी संपर्क साधत आहेत. सत्ता टिकविण्यासाठी ओली यांना आता चीन आणि पाकिस्तानकडून थेट मदत प्राप्त होत आहे.

ट्विटरवर होतेय थट्टा

ओली एकेदिवशी न्यूयॉर्क अमेरिकेत नव्हे तर नेपाळमध्ये असल्याचा ट्विट करतील. खरं तर ऑस्ट्रेलियाही नेपाळमध्येच आहे. पॅरिस, टोकियो, लंडन, बर्लिन, लास व्हेगास, इस्लामाबादही नेपाळमध्येच असल्याचे म्हणत ट्विटर ओली यांची थट्टा उडविली जात आहे.

Related Stories

चार्ली हेब्दोच्या जुन्या कार्यालयाजवळ चाकूहल्ला; चार जखमी

datta jadhav

शेतकरी आंदोलन : हरियाणा सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

pradnya p

सीबीएसई दहावीचा 91.46 टक्के निकाल

Patil_p

शहरातून पलायन

Patil_p

टेरर फंडिंगप्रकरणी एनआयएची छापेमारी

Omkar B

शाळांमध्ये स्कर्ट घालून येत आहेत शिक्षक

Amit Kulkarni
error: Content is protected !!