तरुण भारत

चोरलेल्या सीमकार्डवरुन विनयभंग करणारा जाळय़ात

प्रतिनिधी/ सातारा

मंगळवार पेठेतील एका घरात रात्रीच्या वेळी पहाटे वेळी घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा अनिल बाबासो थोरात (वय 33 रा. मंगळवार पेठ, सातारा) याला शाहूपुरी पोलिसांनी जेरबंद केले आहे. संशयिताने गुन्हा करताना तक्रारदारास जीवे मारण्याची धमकी देत तिचे सीमकार्ड चोरुन नेले होते. मात्र, याच चोरलेल्या सीमकार्डवरुन आरोपीचा माग काढून पोलिसांनी त्याला गजाआड केले आहे. आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Advertisements

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 जून रोजी पहाटे 3.30 च्या सुमारास मंगळवार पेठेतील एका घरात घुसून एका आरोपीने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता. तिने याबाबत कोणास काही सांगू नये अशी धमकी देत आरोपीने तिचे सीमकार्ड चोरुन नेले होते. हा गंभीर स्वरुपाच्या गुन्हा असल्याने वरिष्ठ अधिकाऱयांनी याबाबत तांत्रिक विश्लेषणाद्वारे या गुन्हय़ाचा तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर व संदीप शितोळे, हवालदार अतिश घाडगे, कॉन्स्टेबल सतीश बाबर, सुनिल भोसले तसेच गुन्हे अन्वेषण विभागाचे हवालदार हसन तडवी, लैलेश फडतरे, अमित माने, ओकार यादव, स्वप्निल कुंभार, पंकज मोहिते, चालक नितीन शिंगटे यांनी गुन्हय़ाचा तपास कौशल्यपूर्णतेने करत चोरीस गेलेल्या सीमकार्डवरुन आरोपीचा मार्ग काढत त्याला गजाआड केले आहे.

आरोपीकडून चोरीस गेलेले सिमकार्ड हस्तगत केले करण्यात आले असून त्याच्याकडे अधिक चौकशी केली त्याने 7 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली असून संशयिताला दि. 15 रोजीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर करत आहेत.

Related Stories

पोवईनाक्यावरील अतिक्रमणे हटवली

Patil_p

स्थानिक गुन्हे शाखेने मोगराळे घाटात 8 किलो गांजा पकडला

Patil_p

किरीट सोमय्या जाणार बुधवारी जरंडेश्वरवर

Patil_p

एकाच कुटुंबातील तिघांना कारने चिरडले

Amit Kulkarni

राज्यात पुन्हा सेना-भाजप युती शक्य

Patil_p

पुण्याचा कचरा साताऱयात कसा?

Patil_p
error: Content is protected !!