तरुण भारत

रिक्षा चालकाच्या मुलाने मिळविले घवघवीत यश

प्रतिनिधी/ बेळगाव

कष्ट केले, रिक्षा चालविली, मुलांना शिकविले, मुलाने जेव्हा बारावीच्या परीक्षेत 90 टक्क्मयाहून अधिक गुण मिळविले तेव्हा त्या कष्टाचे फळ मिळाले अशीच काहीशी भावना शिवाजीनगर येथे राहणाऱया जोतिबा खांडेकर या रिक्षा चालकाची झाली आहे. त्यांचा मुलगा रोहित याने विज्ञान विभागातून 91.66 टक्के गुण मिळविले आहेत.

Advertisements

मराठी माध्यमातून शिकूनही त्याने हे घवघवीत यश मिळविले आहे. माध्यमिक शिक्षण मराठी विद्यानिकेतन तर पदवीपूर्व शिक्षण आर. एल. एस. कॉलेजमध्ये रोहितने पूर्ण केले. रोहितची आई ही गृहीणी आहे. रोहितने दहावी प्रमाणेच बारावीमध्येही मन लावून अभ्यास केल्याने त्याला हे यश मिळाले आहे. त्याला पुढे इंजिनियरिंग करायचे असल्याचे त्याने तरुण भारतशी बोलताना सांगितले.

Related Stories

श्री पंत महाराजांचा उत्सव यंदा सांकेतिक स्वरुपात

Patil_p

बेळगाव-कोवाड चेकपोस्टला पोलीस उपायुक्तांची भेट

Amit Kulkarni

चव वाढविणाऱया मिठाच्या दरात वाढ

Patil_p

वडगाव येथील बसथांब्यानजीक डेनेज वाहिनी फुटल्याने समस्या

Amit Kulkarni

आत्महत्या केलेल्या शेतकऱयाच्या कुटुंबियांना भरपाई द्या

Amit Kulkarni

10 हजारहून अधिक बसपास विद्यार्थ्यांच्या हातात

Amit Kulkarni
error: Content is protected !!