तरुण भारत

कोल्हापूर : अखेर पाचगावमध्ये कोरोनाचा शिरकाव

पाचगाव / प्रतिनिधी

रुमाले माळ पाचगाव येथील 35 वर्षाचा युवककाचा कोरोना रिपोर्ट मंगळवारी रात्री पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे पाचगावमध्ये कोरोनाने एन्ट्री केली आहे. रुमाले माळ, आर के नगर येथील पस्तीस वर्षीय युवक शहरातील एका नामवंत कंपनीत काम करतो. या कंपनीमधील पाण्याच्या मोटर बोरिंगमध्ये बसवण्याचे काम हा युवक करतो. संबंधित मोटर कंपनीमधील एक कर्मचारी पॉझिटिव्ह सापडल्यामुळे बाकी कर्मचाऱ्यांचेही स्वॅब घेण्यात आले होते. त्यामध्ये या युवकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे .

हा युवक कालच आपल्या चार मित्रांसह एक पाण्याची मोटर बसवण्यासाठी गेला होता. या युवकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याच्या मित्रांचेही धाबे दणाणले आहेत. यामुळे आर. के. नगर, पाचगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या युवकाच्या संपर्का मधील युवककांना शासकीय विलगीकरणात ठेवले आहे. पाचगावचे सरपंच संग्राम पाटील, माजी उपसरपंच संग्राम पोवाळकर , प्रवीण कुंभार व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी रुमाले माळ परिसर निर्जंतुकीकरण केला आहे.

Advertisements

Related Stories

‘शिष्यवृत्तीच्या रक्कमेत वाढ करणार’

triratna

महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही: फडणवीस

triratna

गोकुळ निवडणूक : माजी आमदार सत्यजित आबांची घरवापसी

triratna

कोल्हापूर : नांगनूरजवळ मगरीच्या दर्शनाने भितीचे वातावरण

triratna

मुंबईतून बॉलीवूड कुणीही हलवू शकणार नाही : चंद्रकांत पाटील

triratna

सांगली : खोट्या गुन्ह्यांना घाबरत नाही – अनिल पाटील

triratna
error: Content is protected !!