तरुण भारत

कोल्हापूर : लक्षतीर्थमध्ये बालविवाह रोखला

प्रतिनिधी / कोल्हापूर

शहरालगतच्या लक्षतीर्थ वसाहतीमधील रेणूका गल्लीतील एका मंदिरात सुरू असलेला बालविवाह रोखण्यास सामाजिक संस्था आणि पोलिसांना यश आले. एक अल्पवयीन मुलगी आणि युवकाच्या प्रेम प्रकरणातून बालविवाह आयोजित करण्यात आला होता. या प्रकाराची माहिती उचगाव (ता. करवीर) येथील चाईल्ड लाईन संस्थेच्या पदाधिकाऱयांना समजली. चाईल्ड लाईनच्या पदाधिकाऱयांनी जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे पदाधिकारी आणि पोलिसांना सोबत घेवून घटनास्थळी जात  बालविवाह रोखला. अल्पवयीन मुलीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली असून या प्रकाराला जबाबदार असणाऱया मुलगा आणि मुलीकडील नातेवाईकांसह  मुलावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Advertisements

याप्रकरणी पोलिसांनी राहुल राजूनाथ गोसावी (वय 24) त्याचे वडील राजूनाथ अशोकनाथ गोसावी (वय 42), आई मनीषा राजूनाथ गोसावी (वय 36, सर्व रा. नवनाथनगर, वाकळी वसाहतशेजारी, इस्लापूर, ता. वाळवा), अल्पवयीन मुलीची आई रेखा संदीप गोसावी (रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) या चौघाविरोधी बाल विवाह प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा नोंद केला. यांची फिर्याद जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या प्रणाली अंनत दुधगावकर (रा. सहजीवन हौसिंग सोसायटी, आर.के.नगर रोड, पाचगांव, ता. करवीर) यांनी दिली आहे.

लक्षतीर्थ वसाहतीमधील अल्पवयीन युवतीशी इस्लामपूरातील नवनाथनगरामधील वाकळी वसाहतमध्ये राहणाऱया राहुल गोसावी या युवकाचे गेल्या काही महिन्यापासून नाजुक संबंधी निर्माण झाले. त्यातून या प्रेमी युगलाने आम्हा दोघाचा विवाह लावून द्यावा, अन्यथा दोघे घरातून पळून जाऊन विवाह करण्याविषयी घरच्यांना धमकी दिली. याला घाबरुन दोन्ही संबंधीत अल्पवयीन युवती आणि त्या युवकाच्या कुटुंबियांनी एकत्र येऊन या दोघांचा विवाह लावून देण्याचे निश्चित केले.  त्यानुसार मंगळवारी (14 जुलै) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास या दोघाचा लक्षतीर्थ वसाहतील रेणूका गल्लीमधील एका मंदिरात बालविवाहाचा घाट घालण्यात आला. अक्षताची वेळ जवळ-जवळ येत होती. तशी दोन्ही कुटूंबात लगबगीच्या हालचाली गतीमान झाल्या होत्या. याचदरम्यान या बालविवाहाची माहिती बातमीदाराकडून रमणमळा येथील चाईल्ड लाईन संस्थेच्या सुरय्या शिकलगार, अस्मिता पवार या पदाधिकाऱयांना मिळाली. त्यांनी याविषयाची माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाला दिली. त्यानुसार या कक्षाच्या प्रणाली दुधगावकर आणि ज्योती भोई या कार्यकर्तीनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर आणि पोलीस कर्मचाऱयांच्या समवेत विवाह स्थळी त्वरीत धाव घेतली. पोलीस आल्याचे पाहून वधू-वराकडील वऱहाडी मंडळीनी विवाह स्थळावरुन धूम ठोकली. पोलिसांनी अल्पवयीन वधू-वरासह त्यांच्या कुटूंबाला चौकशीसाठी ताब्यात घेवून पोलीस ठार्यात आणले. चौकशीदरम्यान अल्पवयीन वधू असल्याचे उघड झाल्याने संबंधीत अल्पवयीन वधूची बालसुधारगृहात रवानगी केली. तर नववरासह त्यांचे आई, वडील आणि संबंधीत युवतीच्या आईला ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधी बालविवाह प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा नोंद केला.

मुलाच्या हट्टाखातर आई-वडील कोठडीत
बालविवाह करणे कायद्याने गुन्हा असल्याचे माहीत असून, देखील मुलांनी पळून जाऊन लग्न करण्याची धमकी दिल्याने, त्या दोघांच्या कुटुंबियांनी एकत्र येवून, या दोघांचा विवाह लावून देण्याचे निश्चित केले. पण प्रेमी युगलाचा हट्टाखातर त्यांच्या आई-वडीलांच्यावर गुन्हा दाखल होवून पोलीस कोठडीत बसण्याची वेळ आली.

Related Stories

विनापरवानगी फ्लेक्स प्रकरणी 5 जणांवर गुन्हे

Patil_p

महाराष्ट्रातील मंदीरे उघडण्यासाठी भाजपचे घंटानाद आंदोलन

Rohan_P

कोल्हापूर जिल्ह्यात दिवसात २७० पॉझिटिव्ह, तिघांचा बळी

Abhijeet Shinde

चाकरमान्यांना 10 दिवस क्वारंटाईनचा निर्णय अंतिम

Patil_p

सातारा जिल्ह्यात 39 नवे कोरोना रुग्ण, 66 जणांना डिस्चार्ज

Abhijeet Shinde

सावधान, दंड वाढलाय नियम मोडू नका विठ्ठल शेलार

Patil_p
error: Content is protected !!