तरुण भारत

कोल्हापूर : नगरसेविकेच्या पतीने केले गटर साफ

प्रतिनिधी / कोल्हापूर

नगरसेविकेच्या पती अथवा नातेवाईकाने महापालिकेच्या कर्मचाऱयाशी, अधिकाऱयांशी हुज्जत घातल्याच्या, मारहाण केल्याच्या बातम्या आजवर नागरिकांनी वाचल्या असतील. मात्र अशा बातम्यांना छेद देणारी वेगळी बातमी आहे. रूईकर कॉलनीतील एका नगरसेविकेच्या पतीने ज्येष्ठ नागरिकाने विनंती केल्यानंतर थेट खोरे हातात घेऊन स्वतः तुंबलेले गटर साफ करून दिले.

Advertisements

भाजपच्या उमा इंगळे या रूईकर कॉलनीतील प्रभागाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांचे पती उदय इंगळे दूधविक्रीचा व्यवसाय करत सामाजिक कार्यातही पुढे असतात. 2015 च्या महापालिका निवडणुकीत उमा इंगळे भाजपच्या तिकीटावर निवडून आल्या. सभागृहातही त्यांनी जनतेचे प्रश्न मांडले. मात्र त्यांचे पती उदय इंगळे कधीही महापालिकेत फिरलेले नाहीत. मात्र प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पत्नी उमा इंगळे यांना मदत करत असतात. सोमवारी सकाळी एक घटना घडली. रूईकर कॉलनीतील फडणीस नामक ज्येष्ठ नागरिकाच्या घरासमोरील गटर तुंबली होती. त्यांनी ही माहिती इंगळे यांना दिली. सफाई कामगार येऊन गेले असल्याचे काम तुंबलेली गटर कोण काढणार? असा प्रश्न होता. उदय इंगळे तेथे आले. त्यांनी खोरे घेऊन थेट तुंबलेल्या गटरमधील कचरा काढला. गटर साफ करून दिली. फडणीसरांनी नमस्कार करून इंगळे आपल्या कामाला निघून गेले. ही छोटीशी गोष्ट नंतर रूईकर कॉलनीत समजली. साऱयांनी इंगळेंचे कौतुक केले.

Related Stories

खरीप हंगमासाठी पीककर्ज वितरणाची उदिष्टपुर्ती लवकर करा : जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde

साताऱयात दुषित पाण्यात धुतला जातोय भाजीपाला

Patil_p

दारूबंदी उठवली म्हणून बार मालकाने केली चक्क वडेट्टीवारांची आरती

Abhijeet Shinde

कुपवाडचा गुन्हेगार सांगली, कोल्हापुर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Abhijeet Shinde

कुंभोज येथे प्रहार अपंग संघटनेच्यावतीने रविवारी दिव्यांग मेळाव्याचे आयोजन

Abhijeet Shinde

वनविभागाने वनमजुरांना कामावर घेण्याची दिली लेखी हमी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!