तरुण भारत

मंत्री मुश्रीफांचे येत्या आठवडय़ातील सर्व कार्यक्रम रद्द

प्रतिनिधी/कोल्हापूर

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत शुक्रवार (ता. 17) ते सोमवार (ता.20) या कालावधीत जिह्यात विविध कार्यक्रम नियोजित होते. हे सर्व कार्यक्रम रद्द केले असून मंत्री मुश्रीफ या आठवडय़ात कुणालाही भेटणार नसल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. 

Advertisements

पूर्वनियोजित कार्यक्रमांमध्ये जिल्हा परिषद सदस्यांना टॅबचे वाटप, गडहिंग्लज व उत्तूर येथे भेटी, शासकीय बैठका, वैयक्तिक गाठीभेटी असे सर्वच कार्यक्रम त्यांनी रद्द केले आहेत. सध्या बदल्यांचा काळ सुरू आहे. ज्यांना बदल्यांची पत्रे द्यावयाची असतील, तसेच महत्त्वाची कामे असतील त्यांनी कागलमध्ये हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या कार्यालयात उदय पाटील व संदीप बोभाटे तसेच कोल्हापूरमध्ये कावळा नाका शासकीय विश्रामगृह येथील ऑफीसचे कार्यालयीन अधीक्षक सचिनकुमार मठपती यांच्याकडे द्यावीत. पुढच्या आठवडय़ात मंत्री मुश्रीफ मुंबईला गेल्यानंतर संबंधित मंत्र्यांकडे ही पत्रे देऊन, त्याची पोहोच दिली जाईल.

Related Stories

दहा हजारांची लाच घेताना मंडलाधिकारी जाळ्यात

Patil_p

परळी खोरे ठरतंय कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट

Abhijeet Shinde

नागठाणेत सोशल डिस्टंसिंगचा फज्जा

Patil_p

धक्कादायक! स्वतःला पेटवून घेत एका तरूणाची पुणे पोलीस आयुक्तालयात धाव

Rohan_P

जलसमाधी आंदोलन : राजू शेट्टी नृसिंहवाडीकडे मार्गस्थ

Abhijeet Shinde

हुतात्मा स्मारकासमोर टपऱयांमध्ये मटका बोकाळला

Patil_p
error: Content is protected !!